नवी दिल्ली, 12 डिसेंबर: विविध कामांकरता आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन (PAN Card) महत्त्वाचे आहे. बँकिग किंवा इतर आर्थिक कामे, सरकारी कामे, विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी, शैक्षणिक किंवा नोकरी विषयक कामांसाठी आधार आणि पॅन हे दोन महत्त्वाचे दस्तावेज तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर आधार-पॅन लिंक असणे देखील गरजेचे आहे. सरकारच्या आदेशानुसार आधार आणि पॅन लिंक करणे (Pan-Aadhaar link) अनिवार्य आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 31 मार्च 2021 पर्यंत हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल. जर लिंकिंगचं काम 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण झालं नाही तर आयकर कायद्या अंतर्गत काही गंभीर परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.
आयकर विभागाच्या मते 31 मार्च 2021 नंतर जर तुम्ही निष्क्रिय PAN वापरत असाल तर इनकम टॅक्स कायदा सेक्शन 272B अंतर्गत 10000 रुपये दंड भोगावा लागेल. या नोटिफिकेशनमध्ये आयकर विभागाने असं म्हटलं आहे की, 31 मार्च पर्यंत करधारकांनी जर पॅन आणि आधार कार्ड लिंक नाही केलं तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
लिंकिंग प्रक्रिया न केल्यास पॅन होईल निष्क्रिय
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या अवधीमध्ये आधार-पॅन लिंक केले नाही (Deadline for Linking PAN with Aadhar Card) तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. हे काम न केल्यास तुमच्या अनेक कामांचा खोळंबा होऊ शकतो.
(हे वाचा-बँकेत पैसे जमा करण्यापेक्षा BEST आहे PPF चा पर्याय, हे आहेत 4 मोठे फायदे
आयटी टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा थांबवायचा असेल तर आधार-पॅन लिंक करणं आवश्यक आहे. आयकर विभागाकडून इशारा देण्यात आला होता की, पॅन-आधार लिंक न केल्यास पॅनकार्ड रद्द करण्यात येईल. मात्र आता ही तारीख आता वाढवण्यात आल्याने ज्यांनी हे काम पूर्ण केले नाही आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे.
कसं कराल पॅन-आधार लिंक?
-आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.
-तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.
-तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल
(हे वाचा-लग्नसराईच्या काळात पुन्हा कमी झाले सोन्याचांदीचे दर,वाचा काय आहेत आजच्या किंमती)
-'View Link Aadhaar Status' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल
-याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.
-UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.
-याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.