बँकेत पैसे जमा करण्यापेक्षा BEST आहे PPF चा पर्याय, हे आहेत 4 मोठे फायदे

बँकेत पैसे जमा करण्यापेक्षा BEST आहे PPF चा पर्याय, हे आहेत 4 मोठे फायदे

एखाद्या बँकेच्या एफडीमध्ये किंवा बचत खात्यामध्ये पैसे गुंतवून ठेवण्यापेक्षा PPF मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचं आहे. वाचा काय आहेत महत्त्वाची कारणं

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: पीपीएफ अर्थात पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुमचे पैसे सुरक्षित तर राहतातच पण त्याचबरोबर कर सवलत देखील मिळते. PPF गुंतवणुकीला सरकारी संरक्षण आहे. यामुळे यामध्ये जोखीमही अजिबात नाही आहे. जे लोकं सेल्फ एम्प्लॉइड आहेत किंवा ईपीएफओचा लाभ घेत नाहीत त्यांच्यासाठी हा गुंतवणुकीचा पर्याय चांगला आहे. बँकेमध्ये तुमचे पैसे डिपॉझिट करण्यापैक्षा यामध्ये पैसे गुंतवणे अधिक फायद्याचे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) मध्ये जाऊन पीपीएफ खाते उघडू शकता. जाणून घ्या काय आहेत महत्त्वाची कारणं-

व्याजदर

PPF मध्ये चांगल्या दराने व्याज मिळते. सध्या यामध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळते आहे, देशातील कोणतीच कमर्शिअल बँक एवढा जास्त व्याजदर देत नाही. स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही एफडीवरील व्याजदर 5 ते 5.5 टक्के आहे. काही छोट्या फायनान्स बँकांमधील व्याजदराची तुलना PPF च्या व्याजदराशी केली जाऊ शकते. बँकेतील विविध गुंतवणुकीच्या पर्यायावर मिळणारे व्याज वार्षिक असते, पीपीएफमध्ये व्याज त्रैमासिक मिळते.

(हे वाचा-जुनी पेन्शन योजना लागू होण्यातील अडथळा दूर, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा)

दोन प्रकारच्या टॅक्स सुविधा

पीपीएफमध्ये गुंतवणूक केली असल्यास आयकर कायदा सेक्शन 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. शिवाय व्याजातून मिळालेल्या उत्पन्नावर देखील सूट आहे.

लाँग टर्म कॉर्पस

पीपीएफ 15 वर्षाची स्कीम आहे ज्या माध्यमातून लाँग टर्म कॉर्पस अर्थात दीर्घकाळासाठी तुमची रक्कम असेल ज्याचा तुम्ही वापर करू शकता. या फंडमधून तुम्ही 5 वर्षांनी पैसे काढू शकता, मात्र यावर काही बंधनंही आहेत. अशामुळे गुंतवणूकदार दीर्घकाळासाठी पैसे वाचवू शकतात.

(हे वाचा-12 डिसेंबरपासून बदलणार Post Office हा नियम, उद्याच पूर्ण करा हे काम अन्यथा...)

छोट्या रकमेची गुंतवणूक करण्याची सुविधा

तुम्ही पीपीएफ खात्यामध्ये कमीत कमी 500 रुपये वार्षिक गुंतवू शकता. जास्तीत जास्त 1 लाख 50 हजाराची तुम्हाला गुंतवणूक करता येईल. पीपीएफ खातेधारकाने जर एखाद्या आर्थिक वर्षामध्ये न्युनतम रक्कम अर्थात 500 रुपये खात्यामध्ये नाही भरले तर ते खाते स्थगित केले जाते. बंद पडलेले खाते पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी 500 रुपयासह तुम्हाला 50 रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागेल. प्रतिवर्षानुसार हे शुल्क निश्चित केले जाईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 12, 2020, 7:45 AM IST

ताज्या बातम्या