आजपासून बदलणार GST आणि आयकरसंबधातील नियम, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार

आजपासून बदलणार GST आणि आयकरसंबधातील नियम, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार

आजपासून नवीन आर्थिक वर्ष (Financial Year 2020-21) सुरू होत आहे. नवीन आर्थिक वर्षात काही नियमही बदलणार आहेत. ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : आजपासून नवीन आर्थिक वर्ष (Financial Year 2020-21) सुरू होत आहे. नवीन आर्थिक वर्षात काही नियमही बदलणार आहेत. GST आणि आयकरसंबधी नियमात होणारे बदल आणि बँकांचे विलीनीकरण यामुळे तुमच्या दैंनदिन आयुष्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे जाणून घ्या 1 एप्रिलपासून कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे.

नवीन करप्रणाली (Income Tax New Systems)

केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2020-21) केंद्र सरकारने पर्यायी दर आणि टॅक्स स्लॅबसह नवीन आयकर प्रणाली (New Income Tax Regime) लागू केली आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  नवीन कर प्रणालीत कोणत्याही सूट आणि कपातीचा कोणताही फायदा होणार नाही. नवीन कर प्रणाली वैकल्पिक आहे म्हणजेच जर करदाता इच्छुक असेल तर तो जुन्या कर स्लॅबनुसार प्राप्तिकर भरू शकतो. त्याचबरोबर नव्या करप्रणालीअंतर्गत वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्याना कोणताही कर भरावा लागणार नाही.

(हे वाचा-RBIची क्रेडिट कार्ड बिल भरण्यास 3 महिन्यांची सूट तरीही वेळच्या वेळी भरा थकबाकी)

5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी कर 10 %, 7.5 ते 10 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी 15%, 10 ते 12 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 % , वार्षिक 15 लाख रुपये वार्षिक उत्पन असणाऱ्यांंसाठी 25 % तर, 15 लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 % कर द्यावा लागेल.

निवृत्तीनंतर 15 वर्षांनी मिळणार पूर्ण पेन्शन

सहा लाखहून जास्त पेन्शनर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिलपासून EPS पेन्शनधारकांना जास्त पेन्शन मिळणार आहे. सरकाररने निवृत्तीनंतर 15 वर्षानंतर पूर्ण पेन्शनचा निर्णय घेतला आहे. 2009 मध्ये हा निर्णय  मागे घेण्यात आला होता. कामगार मंत्रालयाने नवीन नियम अधिसुचित केले आहेत. याशिवाय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)योजनेत पीएफ खातेधारकांसाठी (PF Account holders)एकरकमी पेन्शन काढण्याची मुभा देण्यात आली आहे. 26 सप्टेंबर 2008 च्या आधी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो.

(हे वाचा-कोरोनाचा मोठा दुष्परिणाम! 1.10 कोटी लोक गरिबीच्या दिशेने, जागतिक बँकेचा इशारा)

कम्युटेड पेन्शनचा पर्याय निवडण्याच्या तारखेपासून 15 वर्षांनी पूर्ण पेन्शनचा फायदा दुसऱ्यांदा मिळू लागेल. कर्मचारी पेन्शन स्कीम म्हणजेच EPS च्या हे EPFO सदस्य त्यांच्या पेन्शनच्या एकतृतियांश रक्कम एकरकमी मिळवू शकतात. उरलेली दोन तृतियांश पेन्शन त्यांच्या आयुष्यभर मासिक पेन्शनच्या रूपात मिळत राहील

PSU बँकांचे विलीनीकरण

10 महत्त्वाच्या बँकाचे विलीनीकरण 1 एप्रिलपासून होणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असली तरीही हे विलीनीकरण होणार आहे. 4 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठ्या बँकांच्या विलीनीकरण (PSU Bank Merger) करण्यास मंजूरी मिळाली होती.  देशामध्ये 4 मोठ्या बँका अस्तित्वात येतील. 1 एप्रिल 2020 पासून या बँकांचा कारभार सुरू होणार आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक विलीन होईल, तर कॅनरा बँकेबरोबर सिंडीकेट बँकेचं विलीनीकरण होईल.

(हे वाचा-कोरोना लॉकडाऊन-या 3 महिन्यात वीजबिल भरण्यास विलंब झाला तरी नाही भरावा लागणार दंड)

युनियन बँकेचं आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकेबरोबर विलीनीकरण होणार असून इंडियन बँकेबरोबर अलाहाबाद बँकेचं विलीनीकरण होईल. विलीनकरण झाल्यानंतर ग्राहकांना नवीन अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी मिळू शकतो. ज्या ग्राहकांना नवीन अकाउंट किंवा IFSC कोड मिळेल.

वीन जीएसटी रिटर्न (New GST Return)

जीएसटी काउंसिलच्या 31व्या बैठकीमध्ये टॅक्सपेअर्ससाठी नवीन जीएसटी रिटर्न सिस्टिम घेऊन येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल. यामुळे जीएसटी रिटर्न भरणं अधिक सोपं होणार आहे. नवीन व्यवस्थेअंतर्गत 2 नवीन फॉर्म असणार आहेत. GST FORM ANX-1 आणि GST FORM ANX-2.

परदेशी टूर पकेजसाठी TCS

1 एप्रिल 2020 पासून विदेशी टूर पॅकेज खरेदी करणे आणि परदेशामध्ये कोणताही फंड खर्च करणे महाग होणार आहे.  जर कोणी परदेशी टूर पॅकेज विकत घेत असेल किंवा परकीय चलन एक्सचेंज करत असेल तर त्या व्यक्तीला 7 लाखांहून अधिक रकमेवर टीसीएस अर्थात टॅक्स कलेक्टेड अट सोअर्स द्यावा लागेल.

मोबाइल होणार महाग

त्याचप्रमाणे मोबाइल किंमतींवर नवीन जीएसटी लागू होणार आहे. 1 एप्रिलपासून मोबाइल खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मोबाइलवर असणारा 12 टक्के टॅक्स 18 टक्के करण्यात आला आहे.

First published: April 1, 2020, 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading