नवी दिल्ली, 30 मार्च : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) भीतीदायक वातावरणामध्ये सरकार प्रत्येक निर्णयातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून वीज वितरण कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत की, वीजबिल भरण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणावी. सध्याच्या काळात वीजबिल भरणे शक्य नसेल, तर काळजीचे काही कारण नाही. तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही किंवा वीज देखील कापण्यात येणार नाही. याकरता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात येत आहे. जेणेकरून वीज वितरण कंपन्यांना ग्राहकांसाठी ही उपाययोजना करणे सोपं जाईल. 3 महिन्यांमध्ये वीज कापली जाणार नाही केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लॉकडाऊनमुळे अनेक राज्यातील वीज वितरण कंपन्यांकडे महसूल गोळा होत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना वीज बनवणाऱ्या आणि ट्रान्समिशन कंपन्यांना पैसे देणे कठीण जात आहे. त्यांच्याकडे उत्पन्नच येत नसल्याने वीज वितरण कंपन्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (हे वाचा- मंदीची भीती असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहात? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी ) त्यामुळे ज्याप्रकारे रिझर्व्ह बँकेने ज्याप्रकारे ईएमआयचे हफ्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची सूट दिली आहे, त्याचप्रकारची सुविधा ऊर्जा मंत्रालयाने उपलब्ध केली आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री राज कुमार सिंह यांनी वीज वितरण कंपन्यांना आश्वासन दिले आहे, की त्यांना पुढील 3 महिन्यांसाठी वीज मिळत राहील जेणेकरून ते ग्राहकांना वीज पुरवठा करू शकतील. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांना पत्राद्वारे कळवण्यात येत आहे की, पुढील 3 महिन्यासाठी (30 जून 2020 पर्यंत) कोणत्याही ग्राहकाची वीज कापू नका. (हे वाचा- SBI पाठोपाठ या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर, व्याजदरांमध्ये मोठी कपात ) त्याचप्रमाणे बिल भरण्यास विलंब झाला तरीही कोणताही दंड बसणार नाही. दरम्यान ऊर्जा मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही की, ही सुविधा केवळ घरगुती ग्राहकांसाठी आहे की औद्योगिक ग्राहकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.