वॉशिंग्टन, 31 मार्च : जागतिक बँकेने (World Bank) आपल्या अहवालात सांगितले आहे की, कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चीन आणि पूर्व आशियायी भागात अर्थव्यवस्थेची वृद्धी धीम्या गतीने (Economy Growth Slow) होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ज्यामुळे 1.1 कोटी लोक गरीबीच्या दिशेने वाटचाल करतील. जागतिक बँकेने सांगितलं आहे की, पूर्व आशियामध्ये यावर्षी विकास 2.1 टक्के दराने वाढू शकतो, 2019 मध्ये हा दर 5.8 टक्के होता. बँकेच्या अंदाजानुसार 1.10 कोटी लोक मोठ्या संख्येने गरीबीच्या गर्तेत लोटले जाणार आहेत. (हे वाचा- कोरोना लॉकडाऊन-या 3 महिन्यात वीजबिल भरण्यास विलंब झाला तरी नाही भरावा लागणार दंड ) आधीच्या अंदाजापेक्षा आता बांधण्यात आलेला अंदाज वेगळा आहे. याआधी सांगण्यात आले होते की, विकास दर मर्यादित राहून 3.5 लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर येतील. यामध्ये सांगण्यात आले होते की चीनचा विकास दर 6.1 टक्क्यावरून कमी होऊन 2.3 टक्क्यांवर घसरेल. पूर्व आशिया आणि पॅसिफीक प्रांतातील विश्व बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आदित्य मट्टू यांनी सांगितलं आहे की, हे संकट जागतिक आहे. पण यामुळे सर्वाधिक नुकसान आशियामध्ये होणार आहे. चीनसह पूर्व आशियातील गरीबी मोठ्या वाढणार आहे. (हे वाचा- मंदीची भीती असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहात? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी ) आदित्य मट्टू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘येणाऱ्या काळात आशियामध्ये गरीबी वाढणार आहे.‘चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 2.3 टक्क्यांवर येऊ शकते.’ काही महिन्यांपूर्वी जागतिक बँकेने अशी माहिती दिली होती की चीनचा विकास दर 5.9 टक्के राहील. मात्र कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे चीनसह आशियातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. जगभरात कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. 37 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव या व्हायरसने घेतला आहे. जगभरात संक्रमित लोकांची संख्या 7,84,314 इतकी आहे. तर भारतात 1200 हून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आहेत तर आतापर्यंत 37 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.