लग्नाचा वाढदिवस साजरा करताना झाले मालामाल, भारतीय जोडप्याने जिंकला 3.3 कोटींचा जॅकपॉट

लग्नाचा वाढदिवस साजरा करताना झाले मालामाल, भारतीय जोडप्याने जिंकला 3.3 कोटींचा जॅकपॉट

केरळच्या एका जोडप्याने 3.3 कोटींची लॉटरी जिंकली आहे. एका रात्रीत ते करोडपती झाले आहे. आशिया खंडात प्रसिद्ध असणाऱ्या लोटोलँड (Lottoland) या लॉटरीमध्ये त्यांना जॅकपॉट लागला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: आशिया खंडामध्ये लोटोलँड (Lottoland) ही लॉटरी अतिशय वेगाने प्रसिद्ध होत आहे. दरम्यान या लॉटरीने त्यांच्या पहिल्या जॅकपॉटची घोषणा केली आहे. केरळमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या एका जोडप्याने ही लॉटरी जिंकली आहे. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 3.3 कोटी रुपये त्यांना मिळणार आहे. शाजी मॅथ्यू असं या लॉटरी जिंकणाऱ्या इसमाचं नाव असून तो पत्नीसमवेत लग्नाचा वाढदिवस साजरा करताना त्याला जॅकपॉट जिंकल्याबद्दलचा मेल आला. सुरुवातीला त्याला कुणीतरी गंमत करत असल्याचे वाटले. एवढ्या मोठ्या रकमेमुळे त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य बदलणार असल्याचं शाजी म्हणाले. त्यांनी अशी माहिती दिली की पत्नीबरोबर असणाऱ्या जॉइंट अकाउंटमध्ये ते पैसे ठेवणार आहेत. शिवाय मुलांच्या शिक्षणासाठी देखील काही पैसे वाचवणार असून नवीन घरासाठी देखील काही रक्कम खर्च करणार आहेत. शाजी यांचे आणखीही काही प्लॅन्स असल्याची माहिती मिळते आहे.

(हे वाचा-चहा प्या आणि कपही खाऊन टाका, कोल्हापूरात इंजिनिअर त्रिकुटाची भन्नाट शक्कल)

लोटोलँडच्या एका प्रतिनिधीने देखील याबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'या प्रवासात आमच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे आम्ही खूश आहोत. काही दिवसांपूर्वी आम्हाला आमचा पहिला लखपती मिळाला होता. शाजी आणि त्याच्या कुटुंबासह आम्ही करोडपतीच्या ध्येयापर्यंत पोहोचलो आहोत.'

सुरू करणार अनाथाश्रम

त्यांनी असे म्हटले की, त्यांना अशी माहिती मिळाली आहे की शाजी या रकमेतून त्यांच्या गावाशेजारी एक अनाथाश्रम सुरू करणार आहेत. कोणतीही व्यक्ती अशाप्रकारे पैसे खर्च करण्याचा विचार करत आहे, हे खूप सुंदर असल्याचं लोटोलँडचे प्रतिनिधी म्हणाले.

(हे वाचा-तुमच्या LIC Policy ची सद्यस्थिती काय? घरबसल्या एका क्लिकवर पाहा)

शाजी यांनी लोटोलँडसमवेत व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले आहेत. त्याचप्रमाणे पुढे देखील अशाप्रकारे लॉटरी खेळत राहण्याचा त्यांचा विचार आहे. 5000 कोटींचा पॉवरबॉल जॅकपॉट खेळण्याची त्यांची इच्छा आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 11, 2021, 12:35 PM IST

ताज्या बातम्या