मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Life Certificate: पेन्शनर्सकडे आहेत केवळ 5 दिवस, हे काम पूर्ण न केल्यास थांबेल पेन्शन

Life Certificate: पेन्शनर्सकडे आहेत केवळ 5 दिवस, हे काम पूर्ण न केल्यास थांबेल पेन्शन

तुम्ही जर निवृत्तीवेतनधारक (Retired Employee Pension) असाल, किंवा तुमच्या घरामधील कुणी निवृत्तीवेतनधारकांपैकी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुम्ही जर निवृत्तीवेतनधारक (Retired Employee Pension) असाल, किंवा तुमच्या घरामधील कुणी निवृत्तीवेतनधारकांपैकी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुम्ही जर निवृत्तीवेतनधारक (Retired Employee Pension) असाल, किंवा तुमच्या घरामधील कुणी निवृत्तीवेतनधारकांपैकी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 26 डिसेंबर: तुम्ही जर निवृत्तीवेतनधारक (Retired Employee Pension) असाल, किंवा तुमच्या घरामधील कुणी निवृत्तीवेतनधारकांपैकी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. निवृत्तीवेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (Jeevan Pramaan Patra) हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुम्ही जीवन प्रमाणपत्र अनेक प्रकारे सबमिट करू शकता. तुम्ही ट्रेझरी, बँक शाखा, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि पोस्ट ऑफिसला भेट देऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. सरकारी पेन्शनधारकांसाठी वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. विशेष म्हणजे सरकारी पेन्शनधारकांना त्यांचे निवृत्ती वेतन कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळण्यासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. जीवन प्रमाणपत्र सादर केल्यावरच पेन्शनधारक हयात आहेत की नाही हे समजते. हे वाचा-HDFC Securities ची 'या' शेअरला BUY रेटिंग; 6 महिन्यात 20 नफ्याचा अंदाज ऑनलाइन बनेल जीवन प्रमाणपत्र निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र बनवण्यासाठी स्वतः जाण्याची गरज नाही. जीवन प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाइन देखील तयार करू शकता. तुम्ही केंद्र सरकारच्या जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वरून डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तयार करू शकता. आधार आधारित प्रमाणीकरणाद्वारे हे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार केले जाऊ शकते. डोअर स्टेप सेवेद्वारे जमा करा जीवन प्रमाणपत्र निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने अशी माहिती दिली आहे की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट विभागाच्या डोअरस्टेप सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. डोअरस्टेप बँकिंग अलायन्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक इ. बँकांचा समावेश आहे. हे वाचा-सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे बदल 1 जानेवारीपासून होणार लागू, वाचा सविस्तर तुम्ही वेबसाइट (doorstepbanks.com आणि www.dsb.imfast.co.in/doorstep/login) किंवा डोअरस्टेप बँकिंग, मोबाइल अॅप किंवा टोल-फ्री नंबर (18001213721 किंवा 18001037188) यावर कॉल करून बँकेची डोअरस्टेप सेवा बुक करू शकता. अशाप्रकारेही सादर करा लाइफ सर्टिफिकेट जर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने जमा करणे शक्य नसेल तर तुमची पेन्शन ज्या बँकेच्या शाखेत येते त्याठिकाणी जाऊन तुम्ही हे प्रमाणपत्र जमा करू शकता. याशिवाय, तुम्ही केंद्रीय पेन्शन कार्यालयात जाऊनही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.
First published:

Tags: Pension, Pension funds

पुढील बातम्या