मुंबई, 25 डिसेंबर : ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Securities) अॅलिकॉन कॅस्टलॉयच्या (Alicon Castalloy) शेअर्सवर आपले कव्हरेज सुरू केले आहे. ब्रोकरेज हाऊसने यासाठी 995 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा स्टॉक 823 रुपयांच्या आसपास दिसत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे मत आहे की पुढील 6 महिन्यांत हा स्टॉक 20 टक्क्यांनी वाढून 995 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
HDFC सिक्युरिटीजने आपल्या रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मागणीतील रिकव्हरीमुळे आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत Alicon Castalloy चे निकाल चांगले आले आहेत. या कालावधीत कंपनीच्या कमाईत वार्षिक आधारावर 30.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ती 268 कोटी रुपये आहे.
Secured आणि Unsecured क्रेडिट कार्डमध्ये फरक काय? कोणतं कार्ड ठरेल फायदेशीर?
ऑटो मोबाईल (AutoMobile Sector) विक्रीत वाढ झाल्याचा फायदा कंपनीला झाला आहे. याशिवाय कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन कंपनीला आपल्या उत्पादनाच्या किमतीत वाढ करण्यात यश आले आहे. त्यामुळे त्याच्या मार्जिनवर दबाव आलेला नाही. कंपनीच्या महसुलात निर्यातीचा वाटा 25 टक्के आहे, तर ऑटो विभागाचा वाटा 94 टक्के महसूल आहे.
मागील आठवड्यात 31 स्मॉलकॅप शेअरमध्ये 10-34 टक्के तेजी; पुढील आठवड्यात कशी असेल चाल
कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीच्या EBITDA आणि EBITDA मार्जिनवर महागाईचा दबाव दिसून आला आहे. कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 7 टक्क्यांनी घसरून 24 कोटींवर आला आहे, तर EBITDA मार्जिन वार्षिक आधारावर 370 बेसिस पॉईंट्सने घसरला आहे परंतु तिमाही आधारावर 100 बेस पॉइंट्सने वाढून 9.1 टक्के झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 3 कोटी रुपये होता, तर या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 4 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळ गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर
सेमीकंडक्टरच्या (Semiconductor) पुरवठ्याशी संबंधित समस्या कमी होत असल्याचे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या तिमाहीत उत्पादनात वाढ होणार आहे. ज्याचा कंपनीला फायदा होईल. याशिवाय सरकारकडून EV वाहनांना प्रोत्साहन देण्याचाही फायदा कंपनीला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market