advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Rules Changing in January 2022: सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे बदल 1 जानेवारीपासून होणार लागू, वाचा सविस्तर

Rules Changing in January 2022: सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे बदल 1 जानेवारीपासून होणार लागू, वाचा सविस्तर

नवीन वर्षाच्या सुरुवातीसह सामान्यांवर परिणाम करणाऱ्या काही नियमात देखील (Rules Changing from 1st January 2022) बदल होणार आहे. जाणून घ्या काय आहेत हे बदल

01
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नियमांमध्ये बदल होतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होत असतो. यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीस काही महत्त्वाच्या बँकिंग नियमांचाही समावेश असतो. पुढील महिन्यापासून देखील काही नियमात बदल होत आहे. हे बदल तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे.

02
नवीन वर्षाच्या सुरुवातीसह सामान्यांवर परिणाम करणाऱ्या काही नियमात देखील (Rules Changing from 1st January 2022) बदल होणार आहेत. पुढील महिन्यापासून जे नियम बदलत आहेत त्यात बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder Price) किमती इ. घटकांचा समावेश आहे. जाणून घ्या 1 जानेवारीपासून कोणत्या महत्त्वाच्या आर्थिक नियमात बदल होणार आहेत.

03
LPG च्या किमतीत बदल- दरमहा पहिल्या तारखेला एलीपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर (LPG Cylinder Price) जारी होतात. तेल कंपन्या हे दर नवीन महिन्यातही जारी करतील. त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की वर्षाच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढतायंत की कमी होतील.

04
पोस्ट ऑफिस संबंधित नियम बदलणार- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) अशी घोषणा केली आहे की त्यांनी 1 जानेवारी 2022 पासून ब्रँचमध्ये पैसे काढणे आणि जमा करण्याच्या शुल्काबाबत सुधारणा केली आहे. नवीन नियमानुसार, 1 जानेवारी 2022 नंतर आता एखादा IPPB चा खातेधारक निश्चित फ्री लिमिटनंतर पैसे काढत किंवा जमा करत असेल तर त्याला अधिक शुल्क द्यावे लागेल.

05
गूगलच्या काही Apps चे नियम बदलणार- गूगल (Google) देखील पुढील महिन्यापासून काही महत्त्वाच्या नियमात बदल करत आहे. याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. हा नवीन नियम गूगल सर्व्हिसेस गूगल अॅड्स (Google Ads), यूट्यूब (YouTube), गूगल प्ले स्टोर आणि अन्य पेमेंट सर्विसेसवर लागू होईल. जर तुम्ही पुढील महिन्यापासून RuPay, American Express किंवा Diners Card चा वापर केलात, तर गूगलकडून तुमच्या कार्डची माहिती सेव्ह केली जाणार नाही. त्यामुळे पुढील महिन्यापासून पेमेंट करताना कार्ड डिटेल्स मॅन्युअली प्रविष्ट करावे लागतील.

06
ATM मधून पैसे काढणे महागणार- 1 जानेवारी 2022 पासून ATM मधून पैसे काढणे देखील महागणार आहे. आरबीआयच्या नियमांअंतर्गत आता ग्राहकांना निश्चित मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी (ATM transaction limit) अधिक पैसे मोजावे लागतील. 1 जानेवारीपासून देशातील सर्व बँकांनी एटीएम चार्जेस 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ठराविक मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढल्यानंतर तुम्हाला दरवेळी 21 रुपये मोजावे लागतील. याशिवाय ग्राहकांना जीएसटी द्यावा लागेल. सध्या ही रक्कम 20 रुपये आहे, जी पुढील महिन्यापासून वाढून 21 रुपये करण्यात आली आहे.

07
बदलणार डेबिट क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारीपासून डेबिट क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम लागू करणार आहे. तुम्ही जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर नवीन वर्षात ऑनलाइन कार्ड पेमेंटबाबत नियम बदलत आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सुरक्षेबाबत हा नियम लागू केला जाणार आहे. RBI ने ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित बनवण्यासाठी सर्व वेबसाइट्स आणि पेमेंट गेटवे (payment gateways) द्वारे स्टोअर करण्यात आलेल्या ग्राहकांच्या डेटाला हटवण्यास आणि याजागी व्यवहारासाठी एन्क्रिप्टेड टोकन (encrypted tokens) चा वापर करण्यास सांगितले आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नियमांमध्ये बदल होतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होत असतो. यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीस काही महत्त्वाच्या बँकिंग नियमांचाही समावेश असतो. पुढील महिन्यापासून देखील काही नियमात बदल होत आहे. हे बदल तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement