मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI मध्ये आहे सॅलरी अकाउंट? 30 लाखांपर्यंत फ्री इन्शुरन्ससह मिळेल 2 महिन्याचा आगाऊ पगार, हे आहेत 5 फायदे

SBI मध्ये आहे सॅलरी अकाउंट? 30 लाखांपर्यंत फ्री इन्शुरन्ससह मिळेल 2 महिन्याचा आगाऊ पगार, हे आहेत 5 फायदे

तुमचं सॅलरी अकाउंट जर एसबीआयमध्ये (SBI salary account) आहे तर तुम्हाला काही महत्त्वाचे फायदे देखील मिळत आहेत. जाणून घ्या काय आहेत हे लाभ

तुमचं सॅलरी अकाउंट जर एसबीआयमध्ये (SBI salary account) आहे तर तुम्हाला काही महत्त्वाचे फायदे देखील मिळत आहेत. जाणून घ्या काय आहेत हे लाभ

तुमचं सॅलरी अकाउंट जर एसबीआयमध्ये (SBI salary account) आहे तर तुम्हाला काही महत्त्वाचे फायदे देखील मिळत आहेत. जाणून घ्या काय आहेत हे लाभ

नवी दिल्ली, 09 जुलै: तुमचं सॅलरी अकाउंट जर एसबीआयमध्ये (SBI salary account) असेल तर तुम्हाला काही महत्त्वाचे फायदे देखील मिळतील. State Bank of India च्या पगार खात्यावर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. यामध्ये झिरो मिनिमम बॅलन्स, 30 लाखांपर्यंतचा इन्शुरन्स, कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये मोफत अमर्यादित ट्रान्झॅक्शन्स, मोफत ऑनलाइन NEFT/RTGS, ओव्हरड्राफ्टसह अन्य सुविधांचा समावेश आहे. याशिवायय फ्री एसएमएस अलर्टची (Bank SMS Alert) सुविधा देखील देण्यात येते.

एसबीआय सॅलरी अकाउंटचे फायदे

तुमचे सॅलरी खातं कोणत्या बँकेत असतं हे तुमच्या नियोक्त्यावर बऱ्याचदा अवलंबून असतं. मात्र जर तुमचं हे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला विशेष फायदे मिळतील. वर नमुद केल्यामुळे विम्याचा आणि इतर लाभ तर मिळतातच, शिवाय पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, एज्यूकेशन लोन इत्यादी मध्ये सवलत देखील मिळते.

हे वाचा-PF संदर्भात नवी सेवा, पीएफ खात्यातून एका तासात आगाऊ काढता येतील 1 लाख रुपये

एसबीआयच्या सॅलरी अकाउंटचे महत्त्वाचे पाच फायदे

1. अपघाती मृत्यू विमा (Accidental death cover): SBI सॅलरी खातेधारकाला 20 लाखापर्यंतच्या अॅक्सिडेंटल डेथ कव्हर मिळतो

2. एअर अॅक्सीडेंटल डेथ कव्हर (Air Accidental death cover) : एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हवाई दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास, एसबीआय पगार खातेधारकाला 30 लाखापर्यंतचा हवाई दुर्घटना मृत्यू विमा कव्हर मिळतो.

3. लोन प्रोसेसिंग फीमध्ये (Loan Processing Fee) 50% सूट: SBI Salay खातेधारकाला पर्सनल लोन, होम लोन, कार लोन इ. वर प्रोसेसिंग फीमध्ये 50 टक्के सूट मिळते.

हे वाचा-Home Loan घ्यायचा विचार करताय? आधी जाणून घ्या यासंबंधी महत्त्वाच्या बाबी

4. ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft facility): स्टेट बँक ऑफ इंडिया सॅलरी खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देते. एसबीआय या खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत दोन महिन्यांचा पगार काढण्याची सुविधा देते

5. लॉकर शुल्कामध्ये सूट: SBI सॅलरी अकाउंट होल्डर्सना लॉकर शुल्कामध्ये 25 टक्क्यांपर्यंतची सूट देतं.

First published:
top videos

    Tags: Salary, SBI, State bank of india