Home /News /money /

PF संदर्भात नवी सेवा, पीएफ खात्यातून एका तासात आगाऊ काढता येतील 1 लाख रुपये; वाचा सविस्तर

PF संदर्भात नवी सेवा, पीएफ खात्यातून एका तासात आगाऊ काढता येतील 1 लाख रुपये; वाचा सविस्तर

कोरोना काळात जर लोकांना अचानक पैशांची गरज भासली तर याकरता सरकारने पीएफ संदर्भात एक नवीन सेवा सुरू केली आहे. तुम्ही तुमच्या ईपीएफमधून (Employees Provident Fund EPF) एक लाख रुपये आगाऊ (PF Advance) काढू शकता.

    नवी दिल्ली, 09 जुलै: कोरोना काळात जर लोकांना अचानक पैशांची गरज भासली तर याकरता सरकारने पीएफ संदर्भात एक नवीन सेवा सुरू केली आहे. तुम्ही तुमच्या ईपीएफमधून (Employees Provident Fund EPF) एक लाख रुपये आगाऊ (PF Advance) काढू शकता. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमरजन्सीसाठी हे पैसे काढू शकता. तुम्हाला या सेवेचा फायदा मिळवण्यासाठी खर्च दाखवावा लागेल. 1 जून रोजी EPFO ने सर्क्यूलर जारी करत अशी माहिती दिली आहे की कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मेडिकल अ‍ॅडव्हान्स म्हणून काढता येईल. कोरोना व्हायरससह अन्य आजारपणांसाठी इमरजन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास पीएफमधून पैसे काढता येतील. हा बदल मेडिकल अ‍ॅडव्हान्स सेवेपेक्षा वेगळा आहे याआधीच्या सेवेनुसार मेडिकल इमरजन्सीवेळी ईपीएफमधून पैसे काढता येत होते. ही सेवा तुम्हाला मेडिकल बिल जमा केल्यानंतर मिळत असे. मात्र आता मिळणारा अ‍ॅडव्हान्स आधीच्या सेवेपेक्षा वेगळा आहे. यामध्ये तुम्हाला कोणतंही बिल जमा करायचं नाही आहे. तुम्हाला केवळ अर्ज करायचा आहे आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. हे वाचा-IRCTC च्या शेअरमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, पाहा काय आहे जाणकारांचं म्हणणं असे काढता येतील पैसे -www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होमपेजवर COVID-19 टॅब अंतर्गत ऑनलाइन अ‍ॅडव्हान्स क्लेम करता येईल -https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface -ऑनलाइन सेवांमध्ये जा >> क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) -तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक प्रविष्ट करा आणि व्हेरिफाय करा -Proceed for Online Claim वर क्लिक करा -ड्रॉप डाऊनमधून PF Advance निवडा (Form 31) -तुमचं कारण निवडा आणि त्यानंतर अपेक्षित रक्कम टाका. चेकची स्कॅन कॉपी अपलोड करून तुमचा पत्ता प्रविष्ट करा - Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी मिळेल, तो प्रविष्ट करा -याठिकाणी तुमचा क्लेम फाइल होईल हे वाचा-Amazon च्या धमाकेदार सेलला सुरुवात! AC, फ्रीजवर मिळवा आकर्षक ऑफर्स कोरोना काळात आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्यांसाठी सरकारने ही सेवा सुरू केली आहे. तुम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असेल तर तुम्ही या सेवेचा वापर करू शकता. मात्र तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की अधिक आवश्यकता असल्याशिवाय पीएफमधील पैसे काढू नये
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal

    पुढील बातम्या