मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home Loan घ्यायचा विचार करताय? आधी जाणून घ्या यासंबंधी महत्त्वाच्या बाबी

Home Loan घ्यायचा विचार करताय? आधी जाणून घ्या यासंबंधी महत्त्वाच्या बाबी

पगारदार व्यक्तींपैकी बहुतांश जणांना होम लोन (Home Loan) अर्थात गृह कर्ज घेऊन घर बांधणं किंवा विकत घेणं हा पर्याय सोपा वाटतो, मात्र त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं, प्रक्रिया अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांना नसते.

पगारदार व्यक्तींपैकी बहुतांश जणांना होम लोन (Home Loan) अर्थात गृह कर्ज घेऊन घर बांधणं किंवा विकत घेणं हा पर्याय सोपा वाटतो, मात्र त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं, प्रक्रिया अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांना नसते.

पगारदार व्यक्तींपैकी बहुतांश जणांना होम लोन (Home Loan) अर्थात गृह कर्ज घेऊन घर बांधणं किंवा विकत घेणं हा पर्याय सोपा वाटतो, मात्र त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं, प्रक्रिया अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांना नसते.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 8 जुलै : कोरोनाच्या साथीनंतर अनेक नागरिकांमध्ये 'स्वतःचं घर हवं' ही भावना वाढीला लागली आहे. तसंच 'वर्क फ्रॉम होम' ही संस्कृती तात्पुरती आहे असं म्हणताना आता तीच कायमची होऊन जाईल की काय, अशीही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देखील घरांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. पगारदार व्यक्तींपैकी बहुतांश जणांना होम लोन (Home Loan) अर्थात गृह कर्ज घेऊन घर बांधणं किंवा विकत घेणं हा पर्याय सोपा वाटतो, मात्र त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं, प्रक्रिया अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांना नसते. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडच्या तिमाही आढावा बैठकीत रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आदींमध्ये बदल केलेला नाही. त्याचा अर्थ असा, की आणखी काही काळ तरी गृहकर्जाचे व्याजदर वाढणार नाहीत. गृहकर्ज देणाऱ्या प्रमुख बँका सात टक्क्यांहूनही कमी दरांमध्ये गृहकर्ज देत आहेत. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया (6.70%), बँक ऑफ बडोदा (6.75%), आयसीआयसीआय बँक (6.75%), कोटक महिंद्रा बँक (6.65%) आदींचा समावेश आहे. ज्या व्यक्ती बऱ्याच काळापासून घराचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी गृहकर्जाचे दर कमी असणं ही आशेची गोष्ट आहे. कर्ज घ्यायचं असेल, तर एक मोठी प्रक्रिया असते. तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रं असतील, तर त्यात वेळ वाया जात नाही. तसंच, कर्जाचा अर्जही काळजीपूर्वक भरणं गरजेचं असतं. त्यातला कोणताही रकाना रिकामा सोडू नये. कारण त्यामुळे बँक अधिकाऱ्याचं व्हेरिफिकेशनचं काम वाढतं. तसंच, अर्ज आधीच वाचून त्यातल्या सर्व रकान्यांत नेमकं काय भरायचं, याबद्दल बँक अधिकाऱ्यांकडून माहिती करून घ्यावी. म्हणजे अर्ज भरताना शंका येणार नाही. - तुमच्याकडे तुमच्या अलीकडेच काढलेल्या पासपोर्ट फोटोजच्या अनेक कॉपीज असणंही गरजेचं आहे. कारण कर्जाचा अर्ज भरताना वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी आणि वेगवेगळ्या टप्प्यांत फोटो लागतात. - पॅनकार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी कमीत कमी कोणतंही एक ओळखपत्र (Photo ID) तुमच्यासोबत असणं गरजेचं असतं. शक्य असल्यास कर्जासाठी बँकेत जाताना ही सर्वच ओळखपत्रं सोबत घेऊन गेलं तर काळजीचं काही कारणच उरत नाही. तुम्ही शुद्ध सोनं खरेदी करत आहात का? जाणून घ्या काय आहे सरकारचा नियम - वयाचा पुरावा (Age Proof) म्हणून जन्मदाखला, पॅनकार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, बँक पासबुक किंवा 10वीचं गुणपत्रक यांपैकी कमीत कमी एक तरी कागदपत्र तुमच्यासोबत असावं लागतं. - तुमच्या वास्तव्याच्या पत्त्याचा पुरावा (Address Proof) म्हणून बँक पासबुक, पासपोर्ट, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, वीजबिल, पाणी बिल, गॅस बिल, एलआयसी पॉलिसीची रिसीट किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त प्राधिकरणाचं पत्र यांपैकी कमीत कमी एक कागदपत्र सादर करावं लागतं. - होम लोन किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं कर्ज देताना बँका अर्जदाराच्या माहितीची बारकाईने तपासणी आणि पडताळणी करतात. संबंधित अर्जदार कर्ज फेडण्यास सक्षम आहे की नाही, याची खात्री ते करून घेत असतात. म्हणूनच आवश्यक कागदपत्रं सादर करण्यात कोणतीही कुचराई करू नये. कारण कागदपत्रांवरूनच तुमची सक्षमता सिद्ध होणार असते. पगारदार व्यक्तींनी (Salaried Persons) कर्जासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रं सादर करणं गरजेचं असतं - - फॉर्म 16 - नोकरीत नियुक्तीचं कंपनीने दिलेलं पत्र - गेल्या दोन महिन्यांच्या पगाराची पे-स्लिप - वेतनवाढ किंवा बढतीचं पत्र - गेल्या तीन वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न - टर्म डिपॉझिट, FD, शेअर्स आदींपैकी काही गुंतवणूक असेल, तर त्याचे पुरावे स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना (Professionals) कर्जाचा अर्ज करताना खालील कागदपत्रं सादर करावी लागतात - - गेल्या तीन वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न - कंपनी/फर्मची बॅलन्स शीट आणि नफ्या-तोट्याचं विवरण (सीएकडून सर्टिफाइड) - व्यापारासाठीचं लायसन्स (किंवा अन्य समकक्ष कागदपत्र) - प्रोफेशनल प्रॅक्टिसचं लायसन्स (डॉक्टर्स, सल्लागार आदींकरिता) - संस्थेच्या नोंदणीचं प्रमाणपत्र (दुकानं, कारखाने आणि संस्थांसाठी) - व्यावसायिक पत्त्याचा पुरावा - मालमत्तेची कागदपत्रं कागदपत्रं अटेस्ट (Attested Documents) करून सादर करावीत. तुमचंही एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खातं आहे का? होऊ शकतं मोठं नुकसान,वाचा सविस्तर कर्ज घेताना खालीलपैकी कागदपत्रं (Documents) आवश्यक असतात - - संबंधित सोसायटी किंवा बिल्डरकडून ना हरकत दाखला - घरखरेदीसाठी लागणाऱ्या रकमेचं विस्तृत विवरण - नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र किंवा बिल्डरबरोबर झालेला बाँड (मूळ प्रत) - ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (रेडी टू मूव्ह इन मालमत्तेसाठी) - मालमत्ता कर बिल, मेन्टेनन्स बिल, वीज बिल - फ्लॅटच्या खरेदीसाठी केलेल्या अॅडव्हान्स पेमेंटच्या रिसीट्स - भवन योजनेच्या स्वीकृतीची प्रत - राजस्व प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेली भूमी कर रिसीट आणि ताबा प्रमाणपत्राची मूळ प्रत - बिल्डर किंवा विक्रेत्याला केलेल्या पेमेंट्सची नोंद असेल, अशा बँक खात्याचं विवरण किंवा पेमेंट केल्याच्या रिसीट्स
First published:

Tags: Home Loan, Sbi home loan

पुढील बातम्या