• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • तुमच्या खात्यात नाही आले PM Kisan चे 2000 रुपये? त्वरित नोंदवा या क्रमांकांवर तक्रार

तुमच्या खात्यात नाही आले PM Kisan चे 2000 रुपये? त्वरित नोंदवा या क्रमांकांवर तक्रार

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) नववा हप्ता ज्या शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही आहे, त्यांना या क्रमांकांवर तक्रार नोंदवता येईल

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला आहे. सोमवारी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली. मात्र अद्यापही असे काही शेतकरी आहेत, ज्यांना ही मदत मिळाली नाही आहे. अशावेळी चिंतेची कोणतीही बाब नाही. या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. तुम्ही त्या शेतकऱ्यांपैकी असाल, ज्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांनी चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार दाखल करून शकता. याशिवाय तुम्ही तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता. या कारणामुळे अडकतात पैसे अनेकदा सरकारकडून पैसे पाठवले जातात मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचत नाहीत. यामध्ये काही तांत्रिक कारणं देखील असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांनी प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आणि खाते क्रमांक यामध्ये गोंधळ असल्यास ते पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हे वाचा-Amazon देत आहे दरमहा 60 ते 70 हजार कमावण्याची संधी, केवळ 4 तास करावं लागेल काम 2000 रुपये मिळवण्यासाठी इथे करा तक्रार या योजनेसंदर्भात तक्रार करण्यासाठी तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता आणि त्यांना सविस्तर माहिती देऊ शकता. तिथे तुमचं काम न झाल्यास या योजनेकरता सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार करू शकता. या क्रमांकावर करा संपर्क पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता. हे वाचा-PF वरील व्याजाच्या पैशासंदर्भात मोठी अपडेट! कधी मिळणार EPFO सदस्यांना पैसे? पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: