Home /News /money /

PF वरील व्याजाच्या पैशासंदर्भात मोठी अपडेट! कधी मिळणार EPFO सदस्यांना पैसे?

PF वरील व्याजाच्या पैशासंदर्भात मोठी अपडेट! कधी मिळणार EPFO सदस्यांना पैसे?

EPFO कडून जुलै महिन्यात व्याजाचे पैसे क्रेडिट होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप कोणत्याही कर्मचाऱ्याच्या खात्यात PF वरील ही व्याजाची रक्कम जमा झालेली नाही.

    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: पीएफ खात्यावर (PF Account) मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेच्या प्रतीक्षेत तुम्ही असा ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. EPFO कडून जुलै महिन्यात व्याजाचे पैसे क्रेडिट होतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील जवळपास 6 कोटी नोकरदार वर्ग या पैशांच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अद्याप कोणत्याही कर्मचाऱ्याच्या खात्यात PF वरील ही व्याजाची रक्कम जमा झालेली नाही. सध्या EPFO कडून पीएफवर 8.5 टक्के दराने व्याज (PF Interest Rate) दिले जात आहे. यासंदर्भात EPFO ला ट्विटरवर अनेक प्रश्न विचारले जात आहेत, की नेमके हे पैसे कधी मिळणार आहेत. ईपीएफओने अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि सांगितलं आहे की हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात कधी जमा होतील. ईपीएफओ कडून अशी माहिती देण्यात आली आहे की व्याजदर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच अपडेट करण्यात येईल. आतापर्यंत कोणतीही निश्चित तारीख देण्यात आलेली नाही की ज्या दिवशी पीएफवरील व्याजाचे पैसे खात्यात क्रेडिट केले जातील. मात्र लवकरच हे पैसे मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे वाचा-देशभरात एकाच क्रमांकावर करावा लागेल LPGसाठी कॉल,मिस्ड कॉल देऊन रिफिल करा सिलेंडर दरम्यान तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासायची असेल तर काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही ही रक्कम तपासून शकता. अगदी घरबसल्या एसएमएस पाठवून देखील तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता.  याकरता तुम्हाला तुमचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणं आवश्यक आहे. तुम्हा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन मेसेज पाठवून PF Balance तपासता येईल. जाणून घ्या घरबसल्या पीएफ तपासण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. 1. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे. 2. Missed Call च्या माध्यमातून जाणून घ्या PF Balance यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता हे वाचा-SBI Alert! लवकर पूर्ण करा हे काम अन्यथा खात्यावर होईल परिणाम,पैसे अडकण्याची भीती 3. Umang App च्या माध्यमातून याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता. 4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal

    पुढील बातम्या