नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने अनेकांसाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर Amazon India पैसे कमावण्याची संधी देत असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 55 ते 60 हजार रुपये दर महिन्याला याद्वारे कमावू शकता. Amazon India आपल्या व्यवसाय वाढवत असून या दरम्यान प्रोडक्ट डिलीव्हरीचा वेळ कमी केला जावा यावर भर दिला जात आहे. त्यामुळे कंपनी जवळपास प्रत्येक शहरात डिलीव्हरी बॉयच्या शोधात आहे. यात पॅकेट गोदामातून उचलून ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. जर तुम्हीही हे काम करू इच्छित असाल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या Amazon गोदामात संपर्क करू शकता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एका डिलीव्हरी बॉयला एका दिवसात 100 ते 150 पॅकेट पोहोचवावे लागतात. हे काम गोदामापासून 10 ते 15 किलोमीटर रेंजमध्ये असतं. त्यामुळे हे 4 ते 5 तासात पूर्ण होतं. उत्पादनाची डिलीव्हरी सकाळी 7 पासून ते रात्री 8 पर्यंत केली जाते. त्यामुळे डिलीव्हरी बॉय आपल्या आवडीच्या वेळेनुसार काम करू शकतात. हे वाचा- SBI Alert! लवकर पूर्ण करा हे काम अन्यथा खात्यावर होईल परिणाम,पैसे अडकण्याची भीती जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल, तर https://logics.amazon.in/applynow या लिंकवर क्लिक करावं लागेल. डिलीव्हरी बॉयचा हा जॉब करण्यासाठी डिग्रीची आवश्यक आहे. शाळा किंवा कॉलेजमधील पासिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसंच वस्तूच्या डिलीव्हरीसाठी स्वत:ची बाईक, स्कूटर आवश्यक आहे. बाईक, स्कूटरचं आरसी, विमा वैध तसंच ड्रायव्हिंग लायसन्स असणंही आवश्यक आहे. हे वाचा- देशभरात एकाच क्रमांकावर करावा लागेल LPGसाठी कॉल,मिस्ड कॉल देऊन रिफिल करा सिलेंडर डिलीव्हरी बॉय नोकरीसाठी दर महिन्याला पगार मिळतो. Amazon मध्ये डिलीव्हरी बॉयला 12 ते 15 हजारांपर्यंत फिक्स पगार मिळतो. पेट्रोलचा खर्च स्वत: करावा लागतो. परंतु जर प्रोडक्टच्या डिलीव्हरीनुसार पगार घेतला, तर एका पॅकेटमागे 10 ते 15 रुपये मिळतात. डिलीव्हरी सर्विस प्रोव्हायडरनुसार, एखादा व्यक्ती महिनाभर काम करत असेल आणि दररोज 150 पॅकेट पोहोचवत असेल, तर 55 ते 60 हजार रुपये महिन्याला कमाई होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.