मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुम्ही देखील चेकने पेमेंट करता का? RBI ने आणला हा नवा नियम, जाणून घ्या अन्यथा भरावा लागेल दंड

तुम्ही देखील चेकने पेमेंट करता का? RBI ने आणला हा नवा नियम, जाणून घ्या अन्यथा भरावा लागेल दंड

Cheque Payment: जर तुम्ही चेकच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तुम्हाला आधीपेक्षा सावधानता बाळगणं आवश्यक आहे

Cheque Payment: जर तुम्ही चेकच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तुम्हाला आधीपेक्षा सावधानता बाळगणं आवश्यक आहे

Cheque Payment: जर तुम्ही चेकच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तुम्हाला आधीपेक्षा सावधानता बाळगणं आवश्यक आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: पेमेंट करण्यासाठी रोख रकमेसह चेक पेमेंट, ऑनलाइन, यूपीआय पेमेंट इ. मार्गांचा अवलंब केला जातो. आरबीआय यासंदर्भातील नियमात अनेकदा बदल करत असते. जर तुम्ही चेकच्या (Cheque Payment) माध्यमातून पेमेंट करत असाल तर तुम्हाला आधीपेक्षा सावधानता बाळगणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेने 1 ऑगस्टपासून लागू झालेल्या काही नियमात बदल केले आहेत. केंद्रीय बँकेने आता 24 तास बल्क क्लिअरिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (NACH) 24 तास काम करणार आहे.

नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (National Automated Clearing House System, NACH) आता आठवड्याचे सात दिवस आणि चोविस तास उपलब्ध असणार आहे. याचा फायदा असण्यासह एक सावधानता बाळगणं आवश्यक आहे. आता तुम्हाला चेक द्वारे पेमेंट करताना आणि EMI बाबत अधिक अलर्ट राहणं आवश्यक आहे.

हे वाचा-कोट्यवधी ग्राहकांसाठी SBI Alert! उद्या 3 तास बंद राहणार बँकेच्या या सेवा

खात्यामध्ये बॅलन्स असणं आवश्यक

या नियमाअंतर्गत, आता बँक हॉलिडे असताना देखील चेक क्लिअर होणार आहे. अशावेळी तुमच्या खात्यामध्ये दर वेळी मिनिमम बॅलन्स असणं आवश्यक आहे. त्यामुळे चेक जारी करण्याआधी हे निश्चित करा की तुमच्या खात्यामध्ये आवश्यक रक्कम शिल्लक आहे की नाही. अन्यथा तुमचा चेक बाउन्स होईल, चेक बाउन्स झाल्यास तुम्हाला पेनल्टी रक्कम द्यावी लागेल.

हे वाचा-SBI कडून घेताय Gold Loan? अशाप्रकारे व्याजदरात मिळेल 0.75 टक्क्यांची सूट

EMI वर देखील होईल परिणाम

चेक पेमेंटबाबत सावधानता बाळगताना तुम्हाला EMI, ऑटोमेटेड वीमी प्रीमियम, SIP याबाबत देखील अलर्ट राहणं आवश्यक आहे. कारण या पेमेंट्सची ड्यू डेट सुट्टीच्या दिवशी येत असेल तरी ते पैसे त्या दिवशी खात्यातून कापले जाणार. अशावेळी खात्यात पर्याप्त रक्कम असणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Money, Payment, Rbi, Rbi latest news