जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कोट्यवधी ग्राहकांसाठी SBI Alert! उद्या 3 तास बंद राहणार बँकेच्या या सेवा, वाचा काय आहे वेळ

कोट्यवधी ग्राहकांसाठी SBI Alert! उद्या 3 तास बंद राहणार बँकेच्या या सेवा, वाचा काय आहे वेळ

 बचत खात्यासोबत ‘प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना’ या योजना घेणं अनिवार्य (Insurance Mandatory with SB account) असल्याचं सांगण्यात आलं होतं.

बचत खात्यासोबत ‘प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना’ या योजना घेणं अनिवार्य (Insurance Mandatory with SB account) असल्याचं सांगण्यात आलं होतं.

SBI Banking Services: स्टेट बँक ऑफ इंडियाने 46 कोटी ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने ट्वीट करुन माहिती दिली आहे की उद्या आणि परवा काही वेळासाठी बँकेच्या काही सेवा बंद असणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) खातेधारकांना एक महत्त्वाची सूचना (SBI Important Notice) दिली आहे. बँकेने ट्वीट करत ग्राहकांसाठी अलर्ट जारी केली आहे. बँकेच्या काही सेवा उद्या आणि परवा (6th August and 7th August 2021) ठराविक कालावधीसाठी बंद असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना नियोजन आखून त्यांची काही आवश्यक कामं पूर्ण करता यावीत याकरता बँकेने अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने ट्विटरवर अशी माहिती दिली आहे की, सिस्टिम मेंटेनन्ससाठी 6 आणि 7 ऑगस्ट 2021 रोजी बँकेच्या काही सेवा बंद असणार आहेत. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि यूपीआय सेवांचा समावेश आहे. एसबीआयने ट्वीटच्या माध्यमातून असं म्हटलं आहे की, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून ते रात्री 1 वाजून 15 मिनिटांपर्यंत या सेवा उपलब्ध असणार नाहीत. जवळपास 150 मिनिटांसाठी या सेवा बंद असतील. एसबीआयने यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

जाहिरात

एसबीआयने अशी माहिती दिली आहे की या कालावधी दरम्यान बँकेकडून यूपीआय प्लॅटफॉर्मच्या अपग्रेडेशनचे काम केले जाणार आहे. जेणेकरुन ग्राहकांना उत्तम बँकिंगचा अनुभव घेता येईल. या दरम्यान ग्राहकांचे यूपीआय ट्रान्झॅक्शन बंद असणार आहेत. ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी एसबीआयकडून ठराविक कालावधीनंतर मेंटेनन्स आणि अपग्रेडेशन केलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात