नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: कोरोना काळात अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. लोकांनी पर्सनल लोन (Personal Loan) घेत परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही वैयक्तिक आर्थिक गरजा भागवण्यासाठी, घरखर्चासाठी, शिक्षणासाठी कर्ज घेतलं जात आहे. इतरही काही पर्यायांचा वापर करुन निधी उभारला जात आहे. दरम्यान तुम्ही गोल्ड लोन (Gold Loan) कडे देखील एक चांगला पर्याय म्हणून पाहू शकता. देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामधून (State Bank of India) गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरबसल्या YONO App च्या साहाय्याने हे कर्ज उपलब्ध करू शकता. तुम्हाला यामध्ये खास ऑफरही मिळवता येईल.
07.5 टक्के दराने मिळेल गोल्ड लोन
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आता त्यांच्या बँक शाखांसह योनो अॅपच्या माध्यमातून देखील गोल्ड लोन देत आहे. SBI मध्ये मिळणाऱ्या गोल्ड लोनचा व्याजदर 08.25 टक्के आहे. पण 30 सप्टेंबरपर्यंत खास ऑफर मिळणार आहे. ग्राहकांना 0.75 टक्के सूट मिळेल. अर्थात 30 सप्टेंबरपर्यंत ग्राहकांना 07.5 टक्के दराने गोल्ड लोन मिळवता येईल.
हे वाचा-Gold Price Today: आज 8200 रुपयांनी स्वस्त आहे सोनं, चांदीच्या दरात घसरण
कशाप्रकारे कराल अप्लाय?
-YONO अकाउंटमध्ये लॉग इन करा
-होम पेजवर सर्वात वर असणाऱ्या मेन्यूवर क्लिक करा
-त्यानंतर लोन पर्यायावर क्लिक करुन त्याअंतर्गत असणाऱ्या गोल्ड लोनवर क्लिक करा
-सर्व तपशीलासह दागिन्यांचा तपशील (प्रकार, कॅरेट, वजन इ.) भरा. नेट मंथली इन्कमची माहिती द्या आणि अर्ज जमा करा
-त्यानंतर तुम्हाला तुम्ही लोनसाठी वापरणार असणारं सोनं घेऊन बँकेत जावं लागेल. गहाण ठेवल्या जाणाऱ्या सोन्यासह, 2 फोटो आणि केवायसी कागदपत्र बँकेत जमा करा. यानंतर कागदपत्रांवर हस्ताक्षर करावे लागतील
हे वाचा-ईडीने पाठवली Flipkart ला नोटीस, भरावा लागू शकतो 10000 कोटींचा दंड
फ्लोअर चार्ज आणि प्री-पेमेंट पेनल्टी माफ
-18 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असणारी कोणतीही व्यक्ती गोल्ड लोन घेऊ शकते
-गोल्ड लोनच्या रीपेमेंटचा कालावधी 36 महिन्याचा आहे
-लोनची रक्कम कमीतकमी 20000 रुपये आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपये आहे
-एसबीआयने ग्राहकांसाठी फ्लोअर चार्ज आणि प्री-पेमेंट पेनल्टी माफ केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Loan