मुंबई, 28 जानेवारी : गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) यांचा अर्थसंकल्प शेअर बाजाराला (Share Market) खूप आवडला होता. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या वाढीसह बंद झाले होते. अर्थसंकल्पानंतरही (Budget 2022) शेअर बाजार तेजीत राहिला. यावेळीही अर्थसंकल्पावर बाजारातील प्रतिक्रिया सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. याचे कारण अर्थसंकल्प शेअर बाजारासाठी नकारात्मक असणे अपेक्षित नाही. निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारातील अस्थिरतेने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. सध्या कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा होऊ शकतो हे त्यांना समजत नाही. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने शिफारस केलेल्या अशा 10 स्टॉकची यादी दे आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 3 ते 6 महिन्यांत चांगला नफा मिळवू शकता. यामध्ये L&T, Axis Bank, Tata Motors, United Spirits सारख्या दिग्गजांचा समावेश आहे. ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की कॅपिटल गूड्स सेक्टरने दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केले आहे. L&T या क्षेत्रात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. पाच तिमाहीच्या चांगल्या कामगिरीनंतर Concor चा स्टॉक मंदावलेला दिसत आहे. यामध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे दिसते. येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्या खर्चावर काय परिणाम होणार? चेक करा » एल अँड टी (L&T) - टार्गेट प्राईज 2,168 रुपये » अॅक्सिस बँक (Axis Bank) - टार्गेट प्राईज 870 रुपये » टाटा मोटर्स (Tata Motors) - टार्गेट प्राईज 555 रुपये » युनायटेड स्पिरिट्स (United Spirits)- टार्गेट प्राईज 970 रुपये » बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) - टार्गेट प्राईज 116 रुपये » कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Container Corporation of India Ltd)- टार्गेट प्राईज 698 रुपये » केपीआर मिल्स (KPR Mills) - टार्गेट प्राईज 765 रुपये » नॅशनल अॅल्युमिनियम (National Alluminium) - टार्गेट प्राईज 125 रुपये » भारत डायनॅमिक्स (Bharat Dynamics) टार्गेट प्राईज 548 रुपये » केएनआर कन्स्ट्रक्शन्स (KNR Constructions) - टार्गेट प्राईज 358 रुपये ICICI सिक्युरिटीजला भारत डायनॅमिककडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. स्टॉकने वाढत्या व्हॉल्यूमसह ब्रेकआउट दिल्याचे म्हटले आहे. यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातही चांगली संधी आहे. केपीआर मिल्सची कामगिरी खूप चांगली झाली आहे. दोन महिन्यांच्या फ्लॅट हालचालीनंतर बँकिंग निर्देशांकानेही चांगली ताकद दाखवली आहे. Manyavar IPO: मान्यवरची पॅरंट कंपनी Vedant Fashions चा प्राईज बँड निश्चित, 4 फेब्रुवारीला इश्यू ओपन होणार ब्रोकरेज फर्मने बँक ऑफ बडोदाच्या चांगल्या कामगिरीचा अंदाज वर्तवला आहे. प्रतिस्पर्धी बँकांच्या तुलनेत या बँकेची कामगिरी चांगली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, त्यात गुंतवणूक केल्यास, 3 ते 6 महिन्यांत चांगले उत्पन्न मिळू शकते. साधारणपणे, अर्थसंकल्पापूर्वी, गुंतवणूकदार अशा शेअर्सच्या शोधात असतात ज्यांना अर्थसंकल्पातील घोषणेचा फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.