मराठी बातम्या /बातम्या /मनी /येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्या खर्चावर काय परिणाम होणार? चेक करा

येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्या खर्चावर काय परिणाम होणार? चेक करा

 एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती 1 फेब्रुवारीपासून बदलणार आहेत. यासोबतच बँक ऑफ बडोदा (Bank of Badoda), एसबीआय बँक (SBI Bank) आणि पीएनबी बँकेच्या (PNB Bank) व्यवहारांशी संबंधित नियम बदलतील.

एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती 1 फेब्रुवारीपासून बदलणार आहेत. यासोबतच बँक ऑफ बडोदा (Bank of Badoda), एसबीआय बँक (SBI Bank) आणि पीएनबी बँकेच्या (PNB Bank) व्यवहारांशी संबंधित नियम बदलतील.

एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती 1 फेब्रुवारीपासून बदलणार आहेत. यासोबतच बँक ऑफ बडोदा (Bank of Badoda), एसबीआय बँक (SBI Bank) आणि पीएनबी बँकेच्या (PNB Bank) व्यवहारांशी संबंधित नियम बदलतील.

मुंबई, 28 जानेवारी : नवीन वर्षाचा पहिला महिन्या संपायला काही दिवस उरले आहेत. येत्या 1 फेब्रुवारी 2022 पासून तुमच्या आयुष्याशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वच क्षेत्रातील व्यापारी आणि करदाते वेगवेगळ्या माध्यमातून अर्थमंत्र्यांकडे अर्थसंकल्पातील (Budget 2022) आपल्या अपेक्षा पाठवत आहेत. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेत अर्थव्यवस्थेला चालना मिळावी आणि व्यवसाय वाढावा, असा अर्थसंकल्प असावा, अशी व्यावसायिकांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती 1 फेब्रुवारीपासून बदलणार आहेत. यासोबतच बँक ऑफ बडोदा (Bank of Badoda), एसबीआय बँक (SBI Bank) आणि पीएनबी बँकेच्या (PNB Bank) व्यवहारांशी संबंधित नियम बदलतील.

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांमध्‍ये मनी ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST ​​चार्ज लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाखांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.

Manyavar IPO: मान्यवरची पॅरंट कंपनी Vedant Fashions चा प्राईज बँड निश्चित, 4 फेब्रुवारीला इश्यू ओपन होणार

बँक ऑफ बडोदाचे नियम बदलणार

1 फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांच्या चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलणार आहेत. आता 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टमचे पालन करावे लागणार आहे. म्हणजेच चेकशी संबंधित माहिती पाठवावी लागेल, तरच चेक क्लिअर होईल. हा बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी आहे.

PNB ने ग्राहकांसाठी नियम कडक केले

पंजाब नॅशनल बँक जे नियम बदलणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता किंवा गुंतवणूक फेल झाल्यास, तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत हा दंड 100 रुपये होता.

नोकरीऐवजी 2 लाख रुपयांमध्ये सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला मिळेल 5 लाखांचा भरघोस नफा, जाणून घ्या

LPG सिलेंडरची किंमत

एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. यावेळी 1 जानेवारी 2022 रोजी नवीन वर्षाच्या दिवशी सिलिंडरच्या किमती वाढतात का हे पाहावे लागेल.

1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराशी संबंधित नियमांमध्ये बदल होऊ शकतात.

First published:

Tags: LPG Price, Money, Pnb bank