Home /News /money /

ICICI Bank फेस्टिव्ह ऑफर! शॉपिंगपासून लोनपर्यंत मोठी सवलत, दागिन्यांवर करा 5000 रुपयांची बचत

ICICI Bank फेस्टिव्ह ऑफर! शॉपिंगपासून लोनपर्यंत मोठी सवलत, दागिन्यांवर करा 5000 रुपयांची बचत

आयसीआयसीआय बॅंकेनं (ICICI Bank Festive Offer) आज फेस्टिव्ह बोनान्झा (ICICI Bank Festive Bonanza) सुरू करण्याची घोषणा केली. तुम्ही शॉपिंगपासून लोनपर्यंत विविध गोष्टींवर धमाकेदार ऑफर मिळवू शकता.

मुंबई, 01 ऑक्टोबर: आयसीआयसीआय बॅंकेनं (ICICI Bank Festive Offer) आज फेस्टिव्ह बोनान्झा (ICICI Bank Festive Bonanza) सुरू करण्याची घोषणा केली. अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर प्रीमियम ब्रॅंड आणि लक्झरी वस्तूंसह हजारो उत्पादनांवर त्वरित सूट आणि कॅशबॅक ऑफर्सचा (Cashback Offers) यात समावेश आहे. फेस्टिव्ह बोनान्झाचा एक भाग म्हणून विविध बॅंकिंग उत्पादनं, सेवांवर किरकोळ आणि व्यावसायिक ग्राहकांना बँक आकर्षक लाभही देणार आहे. या सर्व ऑफर्स, आज म्हणजेच 1 ऑक्टोबर 2021 पासून उपलब्ध असतील. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, इंटरनॅशनल लक्झरी ब्रॅंड्स, पोशाख आणि दागिने, किराणा, ऑटोमोबाइल, फर्निचर, प्रवास आणि फूड यासह ग्राहक विविध श्रेणींतील ऑफरचा आनंद घेऊ शकतील. आकर्षक सूट जाहीर करणाऱ्या विशेष ब्रॅंडच्या यादीत फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, मिंत्रा, पेटीएम, बिगबास्केट, ग्रोफर्स, सुपर डेली पेपरफ्राय, जिओमार्ट, मेकमायट्रिप, सॅमसंग, एलजी, डेल, स्विगी, झोमॅटो, ईझीडिनर, त्रिभुवनदास भिमजी झवेरी आदी ब्रॅंड्सचा समावेश आहे. ग्राहक आयसीआयसीआय बॅंक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग, कार्डलेस ईएमआयचा वापर करून या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. हे वाचा-SEBI चा बाबा रामदेव यांना झटका, रुची सोयाकडे मागितलं स्पष्टीकरण; हे आहे कारण ग्राहक कर्जाच्या प्रोसेसिंग फी (Processing Fee in ICICI Bank Loan) मध्ये सूट, कमी ईएमआय आणि बॅंकिंग सेवा, तसंच कर्ज, क्रेडिट कार्ड, बचत आणि चालू खातं, एनआरआय खातं (NRI Account), पैसे हस्तांतरण, ग्राहक वित्त, व्यापारी बॅंकिंग आणि गुंतवणुकीसारख्या अन्य सुविधांचा देखील लाभ घेऊ शकणार आहेत. काय आहे बँकेचं म्हणणं? या बोनान्झा लॉंचबाबत आयसीआयसीआय बॅंकेचे एझिक्युटिव्ह डायरेक्टर अनुप बागची यांनी सांगितलं, की 'आयसीआयसीआय बॅंक ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादनं आणि सेवांची विस्तृत श्रेणी देण्यात नेहमीच आघाडीवर असते. गेल्या 12 ते 18 महिन्यांत खर्चाच्या बाबतीत ग्राहकांचे हात बांधले गेल्याने मागणी कमी झाल्याचं आम्ही पाहिलं. तथापि, गेल्या काही महिन्यांत मॅक्रो इंडिकेटर्स दर्शवतात, की वापर आणि खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी सणासुदीच्या काळात ही मागणी आणि एकूण आर्थिक उलाढालीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना अनेक आघाडीचे ब्रॅंड्स आणि ई- कॉमर्स (offers on E-Commerce platforms) प्लॅटफॉर्मवर ऑफर, सूट आणि कॅशबॅक सुविधा देणार आहोत. या ऑफर्स आयसीआयसीआय बॅंकेचं डेबिट, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि कार्डलेस ईएमआयचा  वापर केल्यावर मिळतील. याशिवाय कर्ज, इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्सकरिता फायनान्ससाठी नो कॉस्ट ईएमआय, बचत आणि चालू खातं, एनआरआय खातं, व्यापारी बॅंकिंग आदींच्या माध्यमातूनदेखील ग्राहकांना फायदा होणार आहे.' हे वाचा-LIC पॉलिसीधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, अशाप्रकारे अपडेट करा तुमचे डिटेल्स या उत्पादनांवर मिळणार सूट >> आयसीआयसीआय बॅंकेचे ग्राहक डेबिट, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग आणि कार्डलेस ईएमआयचा वापर करून सर्व श्रेणींमध्ये आकर्षक सूट मिळवू शकतात. >> प्रमुख ब्रॅंड्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील ऑफर्स – फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, मिंत्रा, टाटा क्लिक आणि पेटीएम मॉलसारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन खरेदी केल्यास 10 टक्के सूट >> इंटरनॅशनल लक्झरी ब्रॅंड्स – अरमानी एक्सचेंज, कॅनाली, क्लार्क्स, डिझल, जियोर्जिया अरमानी, हॅमलीज, ह्युगो बॉस, जिमी चू, केट स्पेड, पॉल अँड शार्क, सत्यापॉल, टिफनी अॅण्ड कंपनी, स्टिव मॅडेन आणि सुपर ड्राइव्हसह अनेक लक्झरी ब्रॅंड्सवर अतिरिक्त 10 टक्के कॅशबॅक. >>  इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्स – एलजी, बॉश, कॅरिअर, डेल, युरेका फोर्ब्ज, गोदरेज एप्लायन्सेस, हायर, पॅनासॉनिक, सोनी, सीमेन्स, व्होल्टास, व्हर्लपूल आदी इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅंड्सवर 10 टक्के कॅशबॅक. तसंच रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स, पाई इंटरनॅशनल, कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स, सरगम इलेक्ट्रॉनिक्स, हरिओम इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक पॅराडाइज, आर्सी इलेक्ट्रॉनिक्स, ग्रेट इस्टर्न इलेक्ट्रॉनिक्स, सेल्स इंडिया, बीग सी, लॉट मोबाइल्स आणि बी न्यू मोबाइल्स आदी ठिकाणीही ग्राहक आकर्षक सूट मिळवू शकतात. हे वाचा-प्रेरणादायी कहाणी! रस्त्यावर राहणाऱ्यांना उपाशी झोपू देत नाही ही Business Woman >> मोबाइल फोन्स – सॅमसंग, एमआय, वनप्लस, रिअलमी, ओप्पो आणि व्हिव्हो यांसारख्या ब्रँड्सच्या मोबाइल खरेदीवर आकर्षक सूट किंवा कॅशबॅक मिळणार आहे. >> कपडे आणि दागिने – शॉपर्स स्टॉप, लाइफस्टाइल, सेंट्रल, आजिओ, फ्लिपकार्ट, पोथी यांसारख्या कपड्याच्या प्रमुख ब्रॅंड्सवर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळेल. त्रिभुवनदास भीमजी झवेरी (TBZ) येथे किमान 50,000 रुपयांची खरेदी केल्यास 5,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. >> किराणा – जिओ मार्ट, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट, बिग बास्केट, ग्रोफर्स, लिशियस, सुपर डेली आणि मिल्क बास्केटमध्ये किराणा खरेदी केल्यास आकर्षक सूट दिली जाणार आहे. >> फूड- झोमॅटो, स्विगी, इझी डिनर आणि इट श्योर (बेहोज बिर्याणी, फासोस, ओव्हन स्टोरी आणि आधिक) आदींवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. कर्जावरील ऑफर्स >> होम लोन - ग्राहक नवं होम लोन आणि अन्य बँकांमधून होम लोन बॅलन्स ट्रान्सफरवर 6.70 टक्क्यांपासून सुरू होणारा आकर्षक व्याजदर (रेपो रेट लिंक्ड) आणि 1100 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्रक्रिया शुल्काचा लाभ घेऊ शकतात. हे वाचा-Air India निर्गुंतवणूक प्रकरणात ट्विस्ट! TATA ने जिंकली नाही बोली;सरकारचा खुलासा >> ऑटो लोन – ग्राहकांना सानुकूल ईएमआयसह कार खरेदी करण्यात मदत करण्यासाठी ही लवचिक योजना आहे. यात 799 रुपये प्रति एक लाखापासून ईएमआय असेल. ग्राहक 8 वर्षांसाठी कर्ज घेऊ शकतील. ग्राहक जुन्या कारच्या कर्जावर 10.5 टक्क्यांसारखा आकर्षक व्याजदर मिळवू शकतील. सध्याच्या कर्जावर टॉप ऑन कर्जही घेऊ शकतील. >> इन्स्टंट पर्सनल लोन – यात 10.25 टक्क्यांपासून आकर्षक व्याज दर आणि 1999 रुपये फ्लॅट प्रक्रिया शुल्काचा समावेश असेल.
First published:

Tags: Amazon, Flipkart, Icici bank

पुढील बातम्या