नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसंदर्भात (Air India Disinvestment) मोठी बातमी (Big Breaking Air India) समोर आली आहे. सरकारी कंपनी एअर इंडियाची खरेदी टाटा (Tata Sons wins bid for Air India: Report) करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. ब्लूमबर्गनेच्या अहवालानुसार टाटा सन्स (Tata Sons) ने एअर इंडियावर लावण्यात आलेली बोली जिंकल्याची माहिती समोर आली होती. मात्र सरकारने हे वृत्त फेटाळले आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) ने या वृत्ताचं खंडन केलं आहे. DIPAM ने ट्वीट केले आहे की, ‘एअर इंडिया निर्गुंतवणुकीच्या प्रकरणात भारत सरकारने आर्थिक निविदांना मंजुरी दिल्याचे सांगणारे मीडिया रिपोर्ट चुकीचे आहेत. सरकार जेव्हा या प्रकरणी निर्णय घेईल तेव्हा माध्यमांना माहिती दिली जाईल.’
Media reports indicating approval of financial bids by Government of India in the AI disinvestment case are incorrect. Media will be informed of the Government decision as and when it is taken: Secretary, Department of Investment and Public Asset Management, GoI pic.twitter.com/PoWk7UceF5
— ANI (@ANI) October 1, 2021
अशी माहिती समोर आली होती की, ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या (Bloomberg Report on Air India) अहवालानुसार, पॅनलने एअर इंडियासाठी टाटा समूहाची निवड केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालय, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी टाटा समूहाचे प्रतिनिधी आणि स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांची भेट घेतल्याचेही वृत्त समोर आलं होतं. मात्र आता अशाप्रकारे कोणत्याही बोलीला मंजुरी देण्यात आल्याच्या वृत्ताचे सरकारकडून खंडन करण्यात आले आहे. हे वाचा- LIC पॉलिसीधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, अशाप्रकारे अपडेट करा तुमचे डिटेल्स दरम्यान डिसेंबर 2021 पर्यंत एअर इंडियाचा करार पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सरकारला हा करार लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. यासह, सरकार या आर्थिक वर्षात एलआयसीमधील आपला हिस्साही विकू शकते.