नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: पतंजली आयुर्वेदचे (Patanjali Ayurveda) बाबा रामदेव यांच्या एका कृतीबाबत भांडवल बाजार नियामक सेबी (Capital Market Regulator SEBI) ने नाराजी व्यक्त केली आहे. सेबीने पतंजलीची सहयोगी कंपनी रुची सोया (Ruchi Soya Ramdev Baba) कडे स्पष्टीकरण मागितले आहे की, बाबा रामदेव यांनी नियामक नियमांचे उल्लंघन का केले? एका योग सत्रादरम्यान, बाबा रामदेव यांनी लोकांना रुची सोया स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. यामुळे भांडवली बाजार नियामक सेबी संतप्त (SEBI got angry on Baba Ramdev) झाली आहे. यानंतर सेबीने रुची सोया कंपनीला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. VIDEO क्लिपच्या आधारावर मागितलं स्पष्टीकरण बाबा रामदेव यांचा समोर आलेला व्हिडीओ त्यांना अडचणीत टाकणारा आहे. सेबीने पाठवलेल्या पत्रात रुची सोयाकडून व्यापारी नियमांचे कथित उल्लंघन, फसवणूक रोखणे, चुकीच्या व्यापार पद्धती आणि गुंतवणूक सल्लागार नियमांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्याचबरोबर, सेबीने रूची सोयाची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (Ruchi Soya FPO) हाताळणाऱ्या बँकर्स आणि कम्पलायन्स टीमला बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. बँकर्स आणि अनुपालन टीमने यावर उत्तर पाठवले आहे. रामदेव यांची व्हिडीओ क्लिप समोर आल्यानंतर सेबीने हे पाऊल उचलले आहे. या व्हिडीओमध्ये एका योगसत्रादरम्यान बाबा रामदेव लोकांना रुची सोयाचे शेअर्स खरेदी करायला सांगत आहेत. हे वाचा- एका SMS च्या जाळ्यात अडकला अन् गमावून बसला 3 लाख, तुम्हालाही आलाय असा मेसेज? पतंजली आयुर्वेदने दोन वर्षांपूर्वी दिवाळखोरी प्रक्रियेत रुची सोया विकत घेतली होती. रुची सोया किंवा पतंजली आयुर्वेद मध्ये रामदेव यांचा वैयक्तिक भागीदारी नाही आहे. परंतु ते या दोन्ही कंझ्यूमर गुड्स ब्रँडचे प्रतिनिधित्व करतात. ते रुची सोयाचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. या अर्थाने, ते कायदेशीररित्या एक इनसायडर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.