मराठी बातम्या /बातम्या /मनी /

उद्योगाबरोबर समाजकार्याचा वसा! रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना उपाशी झोपू देत नाही ही Business Woman, वाचा प्रेरणादायी कहाणी

उद्योगाबरोबर समाजकार्याचा वसा! रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना उपाशी झोपू देत नाही ही Business Woman, वाचा प्रेरणादायी कहाणी

Mumbai Business Woman: त्या महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याबाबतही योजना आखत आहेत. त्याने काहींना स्वतःचा छोटा व्यवसाय उभारण्यास मदत केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर, यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर समाजातील दूर्बल घटकांसाठी फारच कमी लोकं काम करतात. या समाजकार्यामध्ये मुंबईच्या सीमा सिंह (Seema Singh Social Entrepreneur) यांचे नाव आघाडीवर आहे. मुंबईतील उद्योजक सीमा सिंह (Mumbai Seema Singh) हा चेहरा तसा अज्ञात नाही. विशेषतः रस्त्यावर राहणाऱ्या गरीब निराधार लोकांसाठी, ज्यांना कधी कधी दोन वेळची भाकरही मिळत नाही. सीमा त्या अशा गरजू लोकांसाठी देवदूतापेक्षा कमी नाही. रस्त्यावर कोणीही उपाशी झोपू नये हेच त्यांचे ध्येय आहे.

अल्केम फार्माच्या संचालक मंडळाच्या सदस्या सीमा सिंह या भारतातील गरीबांना मदत करणाऱ्या आघाडीच्या सामाजिक-उद्योजक आहेत. मुंबईस्थित सीमा सिंह मेघाश्रय  या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आपण आहोत. अशा परिस्थितीत सुरक्षित राहणे आणि इतरांना सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांनी लोकांना अशी विनंती केली आहे की लोकांनी हात स्वच्छ धुवा आणि मास्क घाला. आपल्या मुलांना सुरक्षित ठेवा, कारण तिसरी लाट मुलांसाठी सर्वात मोठा धोका आहे.

हे वाचा-Air Indiaचं झालं खासगीकरण, 68 वर्षानंतर पुन्हा TATA ची झाली एअर इंडिया- Report

ड्रायव्हरच्या मुलाच्या शिक्षणाचा उचलला खर्च

मीडिया अहवालानुसार, त्यांनी कोविड काळात मुंबईतील गरीब आणि निराधार लोकांना मदत केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की समाजसेवेचे हे काम त्यांच्या घरातूनच सुरू झाले. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरच्या मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती. त्यानंतर त्या समाजसेवेच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यांची स्वयंसेवी संस्था गरीब मुलांना चांगले शिक्षण देते तसेच भुकेल्यांना अन्न पुरवते. याशिवाय, त्यांनी काही खाद्यपदार्थ, झाडं आणि घोंगडी वितरण मोहिमा देखील राबवल्या आहेत. त्या महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याबाबतही योजना आखत आहेत. त्याने काहींना स्वतःचा छोटा व्यवसाय उभारण्यास मदत केली आहे.

First published:

Tags: Business, Mumbai