कोरोनाच्या संकटात 'या' बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार 8 टक्के पगारवाढ

कोरोनाच्या संकटात 'या' बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार 8 टक्के पगारवाढ

देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या कोरोनाच्या संकटकाळात कंपनीमध्ये काम करणाऱ्या 80 हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जुलै : देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या कोरोनाच्या संकटकाळात कंपनीमध्ये काम करणाऱ्या 80 हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. वृत्तसंस्था PTI ने दिलेल्या माहितीनुसार, ICICI ने त्यांच्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या पगारात 8 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीमधील एकूण कर्मचाऱ्यांच्या 80 टक्के ही संख्या आहे. कोरोनाच्या संकटकाळात कर्मचाऱ्यांनी देऊ केलेल्या सुविधेसाठी हा  निर्णय घेण्यात आला आहे.

जुलैपासून वाढणार पगार

सूत्रांच्या माहितीनुसार पगारात झालेली 8 टक्के वाढ आर्थिक वर्ष 2020-21 साठी आहे आणि ती जुलै महिन्यापासून लागू होईल. सूत्रांच्या माहितीनुसार हे कर्मचारी M1 आणि खालील स्तरावरील कर्मचारी आहेत. अधिकतर फ्रंटलाइन स्टाफ आहे, जे ग्राहकांसमोर काम करण्याची भूमिका निभावतात. हे कर्मचारी बँकेच्या शाखा आणि अन्य कामकाज सुनिश्चित करतात.

(हे वाचा-खूशखबर! ऑनलाइन FD केल्यावर याठिकाणी होईल सरकारी बँकांपेक्षा अधिक फायदा)

पगारात वाढ करण्याचा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे, जेव्हा अनेक संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहेत किंवा खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योग आणि इतर व्यवहारांवर परिणाम झाला आहे. अशावेळी या खाजगी बँकेत झालेली पगारवाढ दिलासादायक आहे.

(हे वाचा-EXCLUSIVE : 'कोरोनानंतरचं अर्थसंकट वाटतं तेवढं गंभीर नाही, GDP घेणार U टर्न')

मार्चच्या तिमाहीमध्ये खाजगी क्षेत्रातील या दुसऱ्या मोठ्या बँकेचा शुद्ध लाभ 26 टक्क्यांनी वाढून 1,221 कोटींवर पोहोचला आहे. जो गेल्यावर्षीच्या या तिमाहीमध्ये 969 कोटी रुपये होता.

(हे वाचा-अलर्ट! 3 वर्षांनी परतला खतरनाक Android व्हायरस, एका मेसेजमध्येच होईल खातं रिकामं)

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 8, 2020, 9:55 AM IST

ताज्या बातम्या