Home /News /money /

अलर्ट! 3 वर्षांनी पुन्हा परतला हा खतरनाक Android व्हायरस, एका मेसेजमध्येच होईल तुमचं खातं रिकामं

अलर्ट! 3 वर्षांनी पुन्हा परतला हा खतरनाक Android व्हायरस, एका मेसेजमध्येच होईल तुमचं खातं रिकामं

खतरनाक म्हणून ओळखण्यात येणारा एक जुना अँड्रॉइट मालवेअर (Android Malware) तीन वर्षांनी पुन्हा एकदा परतला आहे. हा व्हायरस तुमचे बँकिंग डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती सहज चौरू शकतो.

    नवी दिल्ली, 06 जुलै : खतरनाक म्हणून ओळखण्यात येणारा एक जुना अँड्रॉइट मालवेअर (Android Malware) तीन वर्षांनी पुन्हा एकदा परतला आहे. हा व्हायरस तुमचे बँकिंग डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती सहज चौरू शकतो. हा फेकस्काय (Fakesky) नावाचा मालवेअर ऑक्टोबर 2017 मध्ये मिळाला होता. त्यावेळी या व्हायरसने जपान आणि दक्षिण कोरियामधील लोकांना त्याचे लक्ष्य बनवले होते. मात्र आता ybereason Nocturnus च्या संशोधकांनुसार हा व्हायरस जगभरातील युजर्सना त्याचे लक्ष्य करत आहे. चीन, तैवान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, युनायटेड किंगडम, युनायटेड ,स्टेट्स आणि इतर काही देशातील नागरिक या व्हायरसच्या निशाण्यावर आहेत. यावेळी हॅकर्स या व्हायरसच्या माध्यमातून डाक सेवेसंदर्भात मेसेज करून फसवत आहेत. यावेळीही या मालवेअरची नजर कोट्यवधी नागरिकांच्या बँक खात्यावर आहे. अहवालानुसार हा मालवेअर Smishing किंवा SMS फिशिंग हल्ला करून युजर्सना लक्ष्य करत आहे. हा युजर्सना एक मेसेज पाठवतो आणि एक App डाऊनलोड करण्यास सांगतो. (हे वाचा-कोरोनाच्या काळात या मुस्लीम देशाने खरेदी केल्या 4 हजार गाई, वाचा काय आहे कारण) तुम्ही हे अॅप डाऊनलोड केल्यास त्याकडून काही परवानगी (app permission) मागितल्या जातात. पहिल्या परवानगी नंतर मालवेअर तुमच्या मोबाइलमधील मेसेज वाचू शकतो आणि दुसऱ्या परवानगी नंतर तुमचे डिव्हाइस लॉक झाल्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये काम चालू राहते. एकदा आवश्यक ती परवानगी मिळाल्यानंतर तुमची अत्यावश्यक माहिती जसे की, तुमचा फोन नंबर, डिव्हाइस मॉडेल, OS व्हर्जन, टेलिकॉम प्रोव्हायडर, बँक डिटेल्स, IMEI नंबर आणि IMSI नंबर चोरी केला जातो. काही संशोधकांच्या मते यामागे एक चिनी ग्रृप  Roming Mantis काम करत आहे. (हे वाचा-केवळ 4,852 रुपयात करा सोनेखरेदी! मोदी सरकारच्या या योजनेत मिळेल अतिरिक्त सूट) संशोधकांनी अशी माहिती दिली आहे की, आमच्या विश्लेषणानंतर हे माहित होत आहे की, यामागे एक चिनी बोलणारा ग्रृप आहे, ज्यांना सर्वसामन्यपणे रोमिंग मेंटिस या नावाने ओळखले जाते. हा असा एक ग्रृप आहे ज्यांना काही वर्षांपूर्वी देखील असेच एक कँपेन सुरू करण्यासाठी ओळखले जायचे'. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Android, Virus

    पुढील बातम्या