जाहिरात
मराठी बातम्या / मनी / How to Save Tax: नवीन आर्थिक वर्षात कसा सेव्ह करावा टॅक्स? या टिप्स ठरतील फायदेशीर

How to Save Tax: नवीन आर्थिक वर्षात कसा सेव्ह करावा टॅक्स? या टिप्स ठरतील फायदेशीर

टॅक्स सेव्हिंग टिप्स

टॅक्स सेव्हिंग टिप्स

How to Save Tax: नवीन आर्थिक वर्षात तुम्हालाही टॅक्स बचत करायची असेल तर आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

How to Save Tax: आपण जे पेरतो तेच उगवतं ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. आर्थिक वर्षासाठी ही म्हण अगदी बरोबर ठरते. तुम्ही मागच्या आर्थिक वर्षात ज्या चुका केला त्या चुका सुधारण्याची वेळ ही नवीन वर्षाच्या सुरुवातीचीच वेळ असते. असे उपाय ज्याच्या मदतीने टॅक्स बचत केली जाऊ शकते. या काळात लोकांचे इंक्रीमेंटही होत असतात. म्हणजेच पगार वाढ होत असते. जास्त सॅलरी तुम्हाला मोठ्या टॅक्स स्लॅबमध्ये घेऊन जाऊ शकते. ज्यामुळे तुमच्यावरील टॅक्सचे ओझे अजुनच वाढू शकतात. मग असे काय उपाय करता येतील ज्यामुळे तुमचा टॅक्सही वाचेल आणि तुमचे पैसेही जमतील. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

News18लोकमत
News18लोकमत

सॅलरी रीस्ट्रक्चर

अनेक कंपन्या या आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन आर्थिक वर्षात सॅलरी रिस्ट्रक्चरचा ऑप्शन देतात. तुम्हालाही हा पर्याय मिळाला तर तुम्ही असा पर्याय निवडावा जेणेकरुन तुमच्या जास्तीत जास्त टॅक्सची बचत होईल. यामध्ये टेलिफोन, इंटरनेट बिल रिम्बर्समेंट, इंधन आणि ट्रॅव्हल बिल रिम्बर्समेंट, जेवण कूपन, वर्तमानपत्र आणि मॅग्जीन बिलांचा समावेश आहे. जीएसटीनंतर कार भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्याय गमावला आहे परंतु ड्रायव्हरचा पगार, पेट्रोल, विमा आणि देखभाल हे घटक अजूनही आहेत.

Home Loan घेण्याचा विचार करताय? मग SBI बँक आहे बेस्ट, मिळताय ‘या’ सुविधा

कोरोना दरम्यान लीव्ह ट्रॅव्हल असिस्टेंसचा फायदा लोकांना मिळू शकला नाही. मात्र आता याचा फायदा घेता येऊ शकतो. तुम्ही रीस्ट्रक्चरिंगमध्ये LTA चा ऑप्शन घेऊ शकता. लक्षात ठेवा की, LTA चा ऑप्शन फक्त वर्षाच्या सुरुवातीलाच मिळतो. नंतर यामध्ये बदल होऊ शकत नाही.

नॅशनल पेन्शन सिस्टम

नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच NPS मध्ये गुंतवणूक करून रिटायरमेंटसाठी चांगली रक्कम जमा करता येते. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुमची रिटायरमेंट प्लानिंग तर मजबूत होतेच शिवाय तुम्हाला टॅक्स सेविंगचा ऑप्शनही मिळतो. 18 ते 70 वयोगटातील कोणतीही व्यक्ती यामध्ये पैसे टाकू शकते. मॅच्युरिटी झाल्यावर 60 टक्के मिळतील आणि उर्वरित रक्कम जमा केली जाईल. याद्वारे, 80C आणि 80CCD अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे.

पुणे तिथे काय उणे! आता हप्त्यावर मिळतोय हापूस आंबा, किती असेल EMI?

NPS अंतर्गत दोन अकाउंट उघडली जातात. टियर-1 अंतर्गत किमान 500 रुपये गुंतवता येऊ शकतात. टियर-2 अंतर्गत 1000 रुपये गुंतवता येतात. आयकराच्या कलम 80CCD (1B) अंतर्गत कर सवलतीबद्दल बोलायचे झाल्यास, 50 हजार रुपयांपर्यंत आणि 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

स्मार्ट गुंतवणूक, योग्य गुंतवणूक

चांगली सुरुवात केली तर तुमचं अर्ध काम तिथेच झालेलं असतं असं म्हणतात. म्हणूनच तुमच्या टॅक्स सेव्हिंग प्लानसाठी वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांपर्यंत थांबू नका. तुम्ही ELSS फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एप्रिलपासूनच SIP सुरू करा. एप्रिलपासूनच हे सुरु केल्यास तुम्ही वर्षाच्या शेवटी तुम्हाला एकदाच रक्कम टाकावी लागणार नाही. एवढेच नाही तर PPF सारख्या पर्यायांमध्ये पैसे टाकून जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल तर एप्रिलपासूनच सुरुवात करा. यामुळे तुम्हाला चक्रवाढीचा खरा फायदा मिळेल

फॉर्म 15G आणि 15H खूप उपयुक्त

तुमचे उत्पन्न बेसिक सूट मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात फायदेशीर गोष्ट आहे. व्याज उत्पन्नावरील TDS टाळण्यासाठी, फॉर्म 15G किंवा 15H सबमिट करणे फार महत्वाचे आहे. पण त्यासाठी तुम्ही पात्र आहात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर कर विभागाला असे वाटत असेल की तुम्ही फॉर्मचा वापर करून चुकीच्या पद्धतीने कर वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, तर तुमच्यावर मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात