जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Home Loan घेण्याचा विचार करताय? मग SBI बँक आहे बेस्ट, मिळताय 'या' सुविधा

Home Loan घेण्याचा विचार करताय? मग SBI बँक आहे बेस्ट, मिळताय 'या' सुविधा

एसबीआय होम लोन

एसबीआय होम लोन

Home Loan: होम लोन घेण्याचा प्लान करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एसबीआय होम लोनविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. यावर कोणकोणत्या सुविधा मिळतात हे देखील जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 एप्रिल: आपलं स्वतःचं एक घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी लोक प्रचंड मेहनत करतात आणि पैसे उभारतात. मात्र घराच्या भल्यामोठ्या किंमतींपुढे आपली सेव्हिंग ही कमीच पडते. अशा वेळी होम लोन हा बेस्ट पर्याय ठरतो. विविध बँका आणि फायनेंशियल इंस्टियूशनच्या माध्यमातून गृहकर्ज घेता येते. याचा वापर नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, नवीन घर बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घराचे नूतनीकरणासाठी वापरले जाऊ शकते. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना होम लोनची सुविधा देते. त्याच्या प्रोडक्ट्समध्ये रेग्युलर होम लोन, एनआरआय होम लोन, फ्लेक्सिपे होम लोन, शौर्य होम लोन, रियल्टी होम लोन आदींचा समावेश आहे.

News18लोकमत
News18लोकमत

एसबीआय रेग्युलर होम लोनचे फीचर्स काय?

-या लोकनमध्ये कमी व्याजासह प्रोसेसिंग फिसही कमी लागते. -यासोतबच प्रीपेमेंट दरम्यान पेनल्टीही द्यावी लागत नाही. -दररोज कमी होत असलेल्या बॅलेन्सवर व्याज लागते. -हे कर्ज 30 वर्षे फेडण्याचा पर्यायही मिळतो. -ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील मिळते. -एखाद्या महिलेने लोन घेतल्यास, महिलेला व्याजात थोडी सूट दिली जाते.

जमिनीची रजिस्ट्री खरी आहे की बनावट? प्लॉट खरेदी करण्यापूर्वी या ट्रिकने करा चेक

SBI रेग्युलर होम लोन कोण घेऊ शकतं?

यासाठी अर्ज करण्यासाठी आयडी कार्ड किंवा ओळखपत्र आवश्यक असेल. पुराव्यासाठी तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र देऊ शकता. यासोबतच लोन अॅप्लिकेशन व्यवस्थितपणे भरलेलं असायला हवं.

3 पासपोर्ट साइज फोटो

अॅड्रेस प्रूफसाठी तुम्ही टेलिफोन बिल, वीज बिल, पाण्याचे बिल, पाइप्ड गॅस बिल किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्डची कॉपी देऊ शकता.

लोन घेणाऱ्यांनो तुमचे अधिकार माहितीये का? तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही धमकी

होम लोनसाठी कसं करावं अप्लाय?

SBI च्या होमलोनसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही SBI च्या कोणत्याही ब्रांचला भेट देऊ शकता. यासोबतच त्यांच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अप्लाय देखील करता येते. कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे प्रदान करावी लागतील. कर्जाची रक्कम, व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी तुमचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्न, मालमत्तेच्या व्हॅल्यूवर अवलंबून असेल. होमलोनसाठी अर्ज करण्यापूर्वी बँकेचे व्याजदर आणि अटी जाणून घेणं गरजेचं आहे. यासोबतच कर्ज करार काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात