मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता SBI मध्ये ऑनलाइन ओपन करा बँक अकाउंट, ही आहे सोपी प्रोसेस!

आता SBI मध्ये ऑनलाइन ओपन करा बँक अकाउंट, ही आहे सोपी प्रोसेस!

एसबीआय

एसबीआय

एसबीआयने ऑनलाइन पद्धतीने खाते उघडण्याची योजना आणली आहे. याद्वारे तुम्हाला बँकेत चकरा माराव्या लागणार नाहीत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी: देशातील सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत आघाडीवर असणारी SBI तुम्हाला घरबसल्या खाते उघडण्याची संधी देत ​​आहे. आता खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ऑनलाइन खाते उघडून, ग्राहक आपल्या स्मार्टफोनवर घरी बसून अनेक बँक सेवांचा लाभ घेऊ शकतो. यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

हे लोक उघडू शकता खाते

-18 वर्षांवरील लोक हे खाते उघडू शकतात.

-SBI चा नवीन ग्राहक किंवा ज्याच्याकडे CIF (customer information file) नाही.

ज्या ग्राहकांची बँक अ‍ॅक्टिव्ह आहे किंवा CIF आहे, ते लोक हे खाते उघडू शकत नाहीत.

WhatsApp च्या माध्यमातून चेक करा बँक बॅलेन्स, पण कसं?

अशा प्रकारे तुमचे अकाउंट उघडा

-तुमच्या मोबाईलमध्ये योनो अ‍ॅप डाउनलोड करा.

-यानंतर तुम्ही व्हिडिओ केवायसीद्वारे तुमचे सेविंग अकाउंट उघडू शकता.

-खाते उघडण्यासाठी, तुमच्या अ‍ॅपमध्ये न्यू टू एसबीआय सिलेक्ट करा.

-आता सेविंग अकाउंट पर्याय निवडा आणि नंतर ब्रांच व्हिजिटच्या ऑप्शनवर टॅप करा.

-त्यानंतर मागितलेल्या आधार पॅनचे डिटेल्स द्या.

-मागवलेले सर्व डिटेल्स भरल्यानंतर, एक व्हिडिओ कॉल करा आणि नियोजित वेळी रिज्यूमद्वारे YONO अ‍ॅपमध्ये लॉग इन करा.

-यानंतर व्हिडिओ केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा.

-हे केल्यानंतर, एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्हेरिफाय केल्यानंतर, डेबिट व्यवहारांसाठी इन्स्टा प्लस बचत खाते उघडले जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही सुविधांचा लाभ घेऊ शकता.

आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस

SBI चे ऑनलाइन फीचर्स

-व्हिडिओ KYC द्वारे तुम्ही SBI Insta Plus बचत खाते उघडू शकता.

-NEFT, IMPS, UPI व्यतिरिक्त, तुम्ही तुमचे पैसे YONO अ‍ॅप किंवा ऑनलाइन SBI इंटरनेट बँकिंगद्वारे आणि इतर मार्गांनी -ट्रान्सफर करू शकता.

-SBI WhatsApp बँकिंगसाठी नोंदणी कशी करावी?

-SBI वेबसाइट https://bank.sbi.com वर जा.

-तुमच्या फोनवर फक्त QR कोड स्कॅन करून SBI सेवा वापरल्या जाऊ शकतात.

-तुम्हाला तुमच्या WhatsApp नंबरवरून +919022690226 वर "Hi" पाठवण्यास सांगितले जाईल आणि चॅट-बॉटच्या -सूचनांचे पालन करण्यास सांगितले जाईल.

-तुमची नोंदणी यशस्वी झाल्यास, तुम्हाला व्हॉट्स अ‍ॅपवर एक व्हेरिफिकेशन मॅसेज मिळेल. साइन अप करण्यासाठी वापरलेल्या फोन नंबरवर हा मॅसेज येईल.

-SMS स्वरूप आणि रेसिपिएंटचा फोन नंबर चेक करा.

-तसेच, ज्या मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवला गेला आहे त्याच्याशी तुमचा बँक खाते क्रमांक जोडलेला आहे की नाही हे एकदा तपासावे लागेल.

-जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल, तर तुम्हाला SBI बँकेच्या शाखेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल.

First published:

Tags: Bank details, SBI, Sbi account, SBI Bank News