मराठी बातम्या /बातम्या /मनी /आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस

आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस

आधार कार्ड

आधार कार्ड

आधारकार्डवरील फोटो हा खूप जुना झाला असेल तर तो बदलण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 जानेवारी: आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. 12 अंकी वैयक्तिक ओळख क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केला जातो. त्यात ओळख क्रमांक आणि बायोमेट्रिक डेटा असतो. सरकारी फॉर्म भरण्यासाठी आणि इतर कामांसाठी आधार आवश्यक आहे. अनेकांना त्यांच्या आधार कार्डावरील फोटो आवडत नाहीत. ते बदलण्याचा विचार तुम्हीही करत आहात का? ज्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. UIDAI नुसार, आधारसाठी अर्ज करताना फोटो आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा फोटो बदलायचा असेल तर तुम्हाला आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल. बायोमेट्रिक अपडेट म्हणजेच फोटो आणि फिंगरप्रिंट ऑनलाइन बदलले जाऊ शकत नाही.

आधार कार्ड मध्ये फोटो कसा बदलायचा

-सर्व प्रथम UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर जा.

-आता आधार नोंदणी फॉर्मवर क्लिक करा.

-फॉर्म भरा आणि आधार सेवा केंद्रात सबमिट करा.

-आधार एग्जीक्यूटिव्ह डिटेल्सची पडताळणी करेल.

-एग्जीक्यूटिव्ह आता नवीन फोटो काढेल. जे तुमच्या आधार कार्डमध्ये जोडले जाईल.

-सेवेसाठी तुम्हाला शुल्क आकारले जाईल.

-आता तुम्हाला एक्नॉलेजमेंट स्लिपसह URN दिला जाईल.

Aadhaar Card: आधार कार्डबाबत मोठी बातमी, नवीन नियम संपूर्ण देशात लागू, जाणून घ्या

URN क्रमांक उपयुक्त ठरेल

तुम्ही URN नंबर वापरून UIDAI वेबसाइटला भेट देऊन तुमच्या आधार कार्डचे स्टेटस तपासू शकता. आधार फोटो अपडेट होण्यासाठी 90 दिवस लागू शकतात. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुम्ही आधार नोंदणी केंद्र किंवा uidai.gov.in वरून अपडेट केलेले आधार कार्ड प्रिंट करू शकता.

फोटो अपडेटसाठी अपॉइंटमेंट

फोटो अपडेटसाठी तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता. एक व्यक्ती दर महिन्याला 4 अपॉइंटमेंट फिक्स करू शकते. आधार केंद्र सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरू राहते.

अपडेटेड आधार कसा डाउनलोड करायचा

UIDAI वेबसाइटवर जा आणि आधार डाउनलोड करा निवडा. आता आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी टाका. कॅप्चा कोड टाका आणि OTP वर क्लिक करा. आता OTP टाका आणि Verify वर क्लिक करा. आता तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

आधारवर पत्ता बदलणे सोपे झाले

आधार कार्डवरील पत्ता बदलणे सोपे झाले आहे. यासाठी UIDAI ने नवा नियम बनवला आहे. त्यामुळे एड्रेस प्रुफ आणि कुटुंबप्रमुखाच्या संमतीने आधार कार्डमधील पत्ता चेंज करता येईल. या प्रक्रियेत 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी पूर्वी वैयक्तिक पुरावा आवश्यक होता.

संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

आधारमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल. येथे पत्ता अपडेट करण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार पडताळणीनंतर प्रमुखाशी संबंध दर्शवणारी कागदपत्रे सादर करावी लागतात.

First published:

Tags: Aadhar Card