मराठी बातम्या /बातम्या /मनी /देशभरात एकाच क्रमांकावर करावा लागेल LPG कनेक्शनसाठी कॉल, मिस्ड कॉल देऊन रिफिल करा सिलेंडर

देशभरात एकाच क्रमांकावर करावा लागेल LPG कनेक्शनसाठी कॉल, मिस्ड कॉल देऊन रिफिल करा सिलेंडर

आता संपूर्ण देशात एलपीजी गॅस कनेक्शन (LPG Connection) घेण्यासाठी किंवा एलपीजी सिलेंडर भरण्यासाठी एकच क्रमांक वापरावा लागणार आहे. या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळेल. ही सुविधा 9 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे.

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: नवीन एलपीजी कनेक्शन (LPG connection) मिळवणं किंवा गॅस सिलेंडर रिफिल (Refill Your LPG Gas Cylinder) करणं अनेकदा गोंधळाचं काम ठरतं. डिस्ट्रिब्युटरच्या ऑफिसमध्ये फेऱ्या घातल्यानंतर ही कामं पूर्ण होतात. मात्र आता संपूर्ण देशात एलपीजी गॅस कनेक्शन घेण्यासाठी किंवा एलपीजी सिलेंडर (LPG Gas Cylinder) भरण्यासाठी एकच क्रमांक वापरावा लागणार आहे. या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळेल. ही सुविधा सध्या केवळ इंडियन ऑइल कॉरपोरेशन (IOC) कडून एलपीजी कनेक्शन घेतल्यास मिळते आहे. याकरता तुम्हाला 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल (Give Missed Call and Refill LPG) द्यावा लागेल. रजिस्टर्ड क्रमांकावर तुम्हाला 8454955555 या क्रमांकावर मिस्ड द्यावा लागेल.

आयओसीच्या चेअरमननी सोमवारी मिस्ड कॉल देऊन सिलेंडर भरण्याची आणि नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याची सुविधा सुरू केली आहे. देशात कुठेही राहणारी व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात. शिवाय आयओसीने एका सिलेंडरचा प्लॅन दोन सिलेंडर प्लॅनमध्ये बदलण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये ग्राहक 14.2 किलोचा दुसरा सिलेंडर घेऊ इच्छित नसल्यास ते दुसरा सिलेंडर केवळ 5 किलोचा घेऊ शकतात. जानेवारी 2021 मध्ये केवळ काही शहरात मिस्ड कॉलवर सिलेंडर भरण्याची किंवा नवीन कनेक्शन घेण्याची सुविधा देण्यात आली होती. आता 9 ऑगस्टपासून ही सुविधा संपूर्ण देशभरातील ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

हे वाचा-स्वप्नातलं घर खरेदी करताय? कागदपत्रांसदर्भात अजिबात विसरू नका या 5 गोष्टी

कशाप्रकारे बुक कराल एलपीजी गॅस सिलेंडर?

>> तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन 8454955555 या नंबरवर मिस्ड कॉल द्या

>>भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) च्या माध्यमातून देखील एलपीजी रिफिल करता येईल

>>इंडियन ऑइल app किंवा https://cx.indianoil.in च्या माध्यमातून देखील बुकिंग करता येईल

>>ग्राहकांना 7588888824 या क्रमांकावर WhatsApp मेसेच्या माध्यमातून देखील सिंलेंडर भरता येईल

>>याशिवाय 7718955555 या क्रमांकावर एसएमएस करुन किंवा आयव्हीआरएस करुन बुकिंग करता येईल

>>Amazon आणि Paytm च्या माध्यमातून देखील सिलेंडर रिफिल किंवा बुक करण्याची प्रक्रिया देण्यात आली आहे.

First published:

Tags: LPG Price