• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • IRCTC ने रेल्वे तिकिट बुकिंगसाठी लागू केला नवा नियम, खोळंबा टाळण्यासाठी वाचा सविस्तर

IRCTC ने रेल्वे तिकिट बुकिंगसाठी लागू केला नवा नियम, खोळंबा टाळण्यासाठी वाचा सविस्तर

IRCTCने कोरोनाचे संक्रमण (Coronavirus) रोखण्यासाठी घेतलेल्या खबरदारीच्या नियमात काहीसा बदल करण्याचे ठरवले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर: IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशन) ने तिकिट बुकिंगसाठी काही नियम जारी केले आहे. COVID-19 पँडेमिकमुळे आयआरसीटीसीच्या काही नियमात बदल करण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. IRCTCच्या निर्णयानुसार आता दुसरा रिझर्व्हेशन चार्ट ट्रेन सुरू होण्याच्या अर्धा तास आधी तयार केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणामुळे हा दुसरा चार्ट दोन तास आधी तयार केला जात असे, मात्र या निर्णयात आता आवश्यकतेनुसार बदल केले जात आहेत. कोरोना व्हायरस काळ सुरू होण्याआधी सामान्यपणे IRCTC चा पहिला चार्ट ट्रेन सुरू होण्याच्या 4 तास आधी जारी केला जात असे. उर्वरित जागांसाठी तिकिट काउंटरवरून तिकिट बुक करता यायचे. एवढेच नव्हे तर अर्धा तास आधी देखील काउंटरवरून तिकिट मिळत असे. यावेळी तुम्हाला दुसरा चार्ट बननण्याआधी ऑनलाइन तिकिट देखील बुक करता यायचे. ही सीट फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह याआधारे दिली जात असे. (हे वाचा-मोठी बातमी! या सरकारी कंपन्या पुढील 9 महिन्यात बंद होण्याची शक्यता) दरम्यान नवीन नियमानुसार आता ट्रेन सुरू होण्याच्या अर्धा तास आधी दुसरा चार्ट जारी केला जाणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी हा बदलाव करण्यात आला आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, 'दुसरा रिझर्व्हेशन चार्ट ट्रेन सुरू होण्याच्या 30 मिनिट ते 5 मिनिट आधी पर्यंत जारी केला जाऊ शकतो. या दरम्यान जर तिकिट रद्द केले गेले तर रिफंड मिळेल. यामुळे त्या प्रवाशांना दिलासा मिळेल ज्यांची योजना शेवटच्या क्षणाला देखील बदलते आणि ट्रेन तिकिट रद्द करावे लागते.' (हे वाचा-आता तरी कमी होणार का कांद्याचे भाव? NAFED ने उचललं महत्त्वाचं पाऊल) रेल्वे मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की, या नवीन सुविधेसाठी  Centre for Railway Information System (CRIS) मध्ये  आवश्यक बदल केले जात आहेत, 10 ऑक्टोबरपासून हा बदलाव करण्यात येत आहे.  IRCTCने ऑनलाइन तिकिट बुकिंगच्या कोणत्याही नियमात बदल केला नाही आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रवाशांना दोन तास आधी रेल्वे स्टेशनवर येणे आवश्यक आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: