मोठी बातमी! या सरकारी कंपन्या पुढील 9 महिन्यात बंद होण्याची शक्यता, सरकार काय आखणार योजना?

मोठी बातमी! या सरकारी कंपन्या पुढील 9 महिन्यात बंद होण्याची शक्यता, सरकार काय आखणार योजना?

दीर्घ काळापासून तोट्यात असणाऱ्या सरकारी कंपन्या बंद करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एनबीसीसीसारख्या एजन्सीला जमीन विकायची जबाबदारी न देण्याची तरतूद केली जाऊ शकते.

  • Share this:

लक्ष्मण रॉय, नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: दीर्घकाळापासून तोट्यात असणाऱ्या सरकारी कंपन्या (Government Companies) लवकरात लवकर बंद करण्यासाठी सरकारकडून काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. CNBC- आवाजला मिळालेल्या सूत्रांच्या Exclusive माहितीनुसार या मार्गदर्शक सूचनांमध्ये जमीन विकण्याची जबाबदारी एनबीसीसी सारख्या कंपन्यांना न देण्याची तरतूद केली जाऊ शकते. अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर (Anurag Singh Thakur) यांनी संसदेत लेखी उत्तर देताना असे म्हटले होते की, निती आयोगाने सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी काही अटी घातल्या आहेत. त्याआधारे 2016 पासून सरकारने 34 कंपन्यांमध्ये धोरणात्मक निर्गुंतवणुकीस मान्यता दिली आहे.

दीर्घकाळापासून तोट्यात असणाऱ्या सरकारी कंपन्यांबाबत या गाइडलाइन जारी केल्या जातील. ज्या कंपन्यांबाबत निर्णय झाला आहेत, त्या येत्या 9 महिन्यात बंद करण्याचा देखील प्रस्ताव आहे. नवीन प्रकरणांबाबत मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर 12 महिन्यांत बंद करण्याची प्रक्रिया अंमलात आणण्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. बंद करण्यापूर्वी बाजारात जमीन किंवा अन्य मालमत्ता विकणे आवश्यक नाही. एनबीसीसी किंवा इतर जमीन व्यवस्थापन एजन्सीची नेमणूक करणेही आवश्यक असणार नाही.

(हे वाचा-Work From Home बाबत सरकारची मोठी घोषणा, शिथिल केले हे महत्त्वाचे नियम)

6 कंपन्या बंद करण्याची तयारी

अनुराग सिंह ठाकुर यांनी संसदेत अशी माहिती दिली की, सध्या 6 कंपन्यांना बंद करण्याचा विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे इतर 20 कंपन्यांसाठीची प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये आहे. ज्या कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू आहे त्यामध्ये हिंदूस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड (HFL), स्कूटर्स इंडिया, भारत पंप्स अँड कम्प्रेसर्स लिमिटेड, हिंदूस्तान प्रीफॅब, हिंदूस्तान न्यूजप्रिंट आणि कर्नाटक अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड या कंपन्या समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे एलॉय स्टील प्लांट, दुर्गापूर, सेलम स्टील प्लांट, सेल चं भद्रावती यूनिट, पवन हंस, एअर इंडिया आणि त्यांच्या पाच सहाय्यक कंपन्यांबाबत एका संयुक्त उपक्रमामध्ये धोरणात्मक विक्रीची प्रक्रिया केली जात आहे.

(हे वाचा-पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! रांगेत उभं न राहता घरबसल्या जमा करा जीवन प्रमाणपत्र)

एचएलएल लाइफ केयर लिमिटेड, इंडियन मेडिसिन अँड फार्मास्यूटिक्ल कॉरपोरेशन लिमिटेड, आयटीडीसी चे विभिन्न यूनिट्स, हिंदूस्तान अँटीबायोटिक्स, बंगाल केमिकल्स अँड फार्मास्यूटिकल्स, भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड, शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कॉरपोरेशन ऑफ इंडिया आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेड यांच्याबाबत देखील स्ट्रॅटिजिक विक्री होईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 6, 2020, 5:51 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading