Home Loan Tips: आपलं स्वतःचं घर असणं ही प्रत्येकाची गरज असते. मात्र गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या प्रॉपर्टीच्या किंमती या गगणाला भिडल्या आहेत. अशा वेळी सामान्य व्यक्तीने आपल्या इन्कमवर घर खरेदी करणं सोपं राहिलेलं नाही. याच कारणामुळे आजच्या काळात जास्तीत जास्त लोक होम लोनच्या मदतीने आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करतात. पण होम लोन घेण्यापूर्वी फक्त व्याजदर पाहणंच पुरेसं नसतं. इतर अनेक गोष्टी असतात ज्या समजून घेणे गरजेचे असते. तुम्हीही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर होम लोन संबंधित काही खास गोष्टी अवश्य घ्या जाणून.
कर्ज घेण्यापूर्वी तुमची आर्थिक स्थिती तपासा होम लोन घेण्यापूर्वी तुम्हाला थोडे डाउन पेमेंट देखील करावे लागेल. ते प्रॉपर्टीच्या एकूण किमतीच्या 10 टक्के ते 25 टक्के असू शकते. तसेच, कर्ज घेतल्यानंतर, दर महिन्याला तुमचा मासिक हप्ता सुरू होईल, जो दीर्घकाळ चालेल. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःची आर्थिक स्थिती एकदा नीट पाहावी. जेणेकरून नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. किती सॅलरी असल्यावर खरेदी करावं घर? काय आहे फॉर्मूला? वाचा सविस्तर अशी ठरवा लोनची रक्कम कर्ज घेण्यापूर्वी, सर्व गरजा आणि दायित्वे लक्षात घेऊन तुम्ही किती हप्ता सहज भरू शकता याचं एकदा कॅल्क्युलेशन करा. त्यानंतरच तुम्ही किती रक्कम कर्ज म्हणून घ्यायची ते ठरवा. साधा नियम असा आहे की, तुमचा ईएमआय तुमच्या घरी येणाऱ्या पगाराच्या 40% पेक्षा जास्त नसावा. HDFC च्या मर्जरनंतर होम लोन आणि FD च्या गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार? सोप्या भाषेत घ्या समजून लोन फीचर्सची तुलना करा कर्ज घेताना तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा. यामुळे तुमची विश्वासार्हता वाढते आणि कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. बर्याच वेळा चांगल्या क्रेडिट स्कोअरवर चांगल्या व्याजदरावर कर्ज देखील उपलब्ध होते. याशिवाय वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर, कर्जाची रक्कम, एलटीव्ही प्रमाण, कर्जाचा कालावधी आणि प्रोसेसिंग फिस यामध्ये फरक असतो. अशा वेळी होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी, बँकांच्या लोन फीचर्सची तुलना करा, त्यानंतर कर्जासाठी अप्लाय करा. अधिक डाउन पेमेंट भरण्याचे फायदे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर होम लोनसाठी अधिक डाउन पेमेंट भरा. यामुळे तुम्हाला कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. काही लेंडर कर्जदारांना कमी व्याजदर देतात जे कमी LTV प्रमाण निवडतात. परंतु जास्त डाउन पेमेंट देण्यासाठी तुमचा एमरर्जेन्सी फंड वापरणे टाळा. Real Estate: प्रॉपर्टीत आहे पैसाच पैसा! या 6 गोष्टी लक्षात ठेवल्यास मिळेल जबरदस्त नफा एवढा असावा एमरर्जेन्सी फंड जर तुम्ही कर्जासाठी अर्ज करणार असाल तर इमर्जन्सी फंड नक्कीच तुमच्याकडे ठेवा. हे तुमच्या 6 महिन्यांच्या EMI हप्त्यांइतके असावे. काहीवेळा नोकरी गमावल्यामुळे किंवा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे ईएमआयची परतफेड करणे कठीण होते. यामुळे दंड होऊ शकतो, तसेच तुमच्या क्रेडिट स्कोअरचे नुकसान होऊ शकते. इथेच तुमचा आपत्कालीन निधी कामी येतो.