जाहिरात
मराठी बातम्या / मनी / किती सॅलरी असल्यावर खरेदी करावं घर? काय आहे फॉर्मूला? वाचा सविस्तर

किती सॅलरी असल्यावर खरेदी करावं घर? काय आहे फॉर्मूला? वाचा सविस्तर

होम लोन इएमआय

होम लोन इएमआय

घराचा निर्णय प्रत्येकाच्या गरजेनुसार घ्यायचा असतो. नोकरी, कामाचं स्वरूप, कामाचं ठिकाण या आधारावर घराचा निर्णय घेता येतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 22 जून : स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी पैसे साठवणं, कर्ज काढणं व आयुष्यभर ते कर्ज फेडत राहणं हेच अनेकांचं जीवन होतं. गेल्या काही वर्षांत घरांचे भाव खूप वाढले आणि कर्ज काढून घर घेणं अनेकांना परवडेनासं झालं. त्यामुळे आता घर विकत घेण्यापेक्षा भाड्याच्याच घरात राहावं असाही विचार अनेक जण करत आहेत; मात्र कर्ज काढून घर विकत घेण्यासाठी वेतनही चांगलं असावं लागतं. या पार्श्वभूमीवर तुम्हीही घर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. किती वेतन असल्यावर घर विकत घेण्याचा निर्णय घेऊ शकता याबाबत जाणून घेऊ या. याबाबत माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    स्वतःचं घर विकत घेण्याचा निर्णय तुमची गरज व मिळणारे पैसे यावर अवलंबून असतो. गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी लागल्यावर लगेचच स्वतःचं एक घर विकत घेण्याचा ट्रेंड मेट्रो शहरांमध्ये होता. आता मात्र घरांच्या किमती आवाक्याबाहेर जाऊ लागल्यानं भाड्यानेच राहण्याचा पर्याय अनेक जण निवडू लागले आहेत. घर विकत घेण्यासाठी वेतन आणि कर्जाचा हप्ता यांचा ताळमेळ बसावा लागतो. ते गणित जमलं, तर घर घेण्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप होत नाही. Top Up Loan: टॉप अप होम लोन म्हणजे काय? किती दिवसांसाठी मिळतं? एका क्लिकवर घ्या जाणून घर विकत घेण्यासाठी बहुतांश जणांना कर्ज काढावं लागतं. त्यामुळे घर विकत घ्यायचं असेल, तर घराची किंमत किती आहे व आपलं वेतन किती आहे, हे पाहिलं पाहिजे. याचा सर्वोत्तम फॉर्म्युला म्हणजे गृहकर्जाचा हप्ता वेतनाच्या 20 ते 25 टक्के इतकाच असला पाहिजे. उदाहरणार्थ, तुमचा पगार 1 लाख रुपये असेल, तर तुम्ही 25 हजारांचा हप्ता सहज देऊ शकता; पण तुमचा पगार 50-70 हजार रुपयांच्या दरम्यान असेल, तर तुमच्यासाठी हा हप्ता जास्त असू शकतो. हप्ता 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर 50-70 हजार रुपये पगार असलेल्या व्यक्तीही घर घेऊ शकतात. घराची किंमत 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर 50-70 हजार रुपये पगार असलेल्यांना असं घर विकत घेणं तोट्याचं ठरू शकतं. त्यापेक्षा भाड्याने राहणं अधिक सोयीचं असेल. भाड्याने राहताना दरमहिना बचत करता येऊ शकते व पगार 1 लाखाच्या पुढे गेला की घर विकत घेण्याचा विचार करता येईल. त्यावेळी जास्तीत जास्त डाउन पेमेंट करून कर्जाचा हप्ता कमी करता येईल. 1 लाख रुपये पगार असेल, तर 30-35 लाख रुपयांचं घर घेणं आर्थिकदृष्ट्या योग्य ठरतं. पगार दीड लाख रुपये असेल, तर घराचं बजेट 50 लाखांपर्यंत ठेवता येतं. Bank Loan: लोन अप्लाय करताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष, बँक घरी बोलवून देईल कर्ज घराचा निर्णय प्रत्येकाच्या गरजेनुसार घ्यायचा असतो. नोकरी, कामाचं स्वरूप, कामाचं ठिकाण या आधारावर घराचा निर्णय घेता येतो. बहुतेकसे जण नोकरीच्या सुरुवातीलाच एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात; मात्र पहिल्याच नोकरीमध्ये घर घेतलं असेल, तर मग नोकरी बदलणं त्याना नंतर शक्य होत नाही. नोकरीची सुरक्षितता नसेल, तरीही घर विकत घेण्याचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. घर विकत घेताना आणखीही काही गोष्टी पाहाव्या लागतात. ज्या भागात भाड्याची किंमत जास्त मिळेल, तिथे घर घेण्याचा प्रयत्न करावा. घराच्या किमतीत वर्षाला कमीत कमी 8 ते 10 टक्क्यांची वाढ होणं गरजेचं असतं. म्हणजे वाढत्या महागाईनुसार घराची किंमत वाढेल व गृहकर्ज फेडलं जाईल. 20 वर्षांनंतर घराची किंमत तिप्पट झाली असली पाहिजे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात