जाहिरात
मराठी बातम्या / मनी / HDFC च्या मर्जरनंतर होम लोन आणि FD च्या गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार? सोप्या भाषेत घ्या समजून

HDFC च्या मर्जरनंतर होम लोन आणि FD च्या गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार? सोप्या भाषेत घ्या समजून

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक

HDFC लिमिटेडचा 1 जुलैपासून HDFC बँकेत मर्जर होणार आहे. या विलीनीकरणाचा HDFC होम लोन घेणारे आणि फिक्स्ड डिपॉझिट गुंतवणुकदारांवर कसा परिणाम होईल ते पाहूया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जून : हाउसिंग डेव्हलपमेंट फायनेंस म्हणजेच HDFC 1 जुलै 2023 पासून HDFC बँकेत विलीन होत आहे. या वर्षी हे देशातील सर्वात मोठ्या विलीनीकरणांपैकी एक असणार आहे. नवीन एंटिटीचे व्हॅल्यूएशन 40 बिलियन डॉलर एवढे आहे. दरम्यान एचडीएफसीकडून होम लोन घेतलेल्या कर्जदारांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतील. जर एखाद्या गुंतवणूकदाराने HDFC मध्ये फिक्स्ड डिपॉझिट केलं असेल, तर त्याच्या मनात त्याच्या पैशांशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतील. या विलीनीकरणाचा लोनवर किंवा डिपॉझिटवर काय परिणाम होईल ते सोप्या भाषेत समजून घेऊ. HDFC चं होम लोन घेणाऱ्यावर काय परिणाम होणार? विलीनीकरणाअंतर्गत, HDFC चे संपूर्ण होम लोन हे HDFC बँकेकडे ट्रान्सफर केले जाईल. जर एखाद्या कर्जदाराला त्याचे होम लोन EBLR शी लिंक करायचे असेल तर त्याला ही सुविधा मिळेल. EBLR ला एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट्स म्हणतात. जे रेपो रेटशी जोडलेले असतात. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यास कर्जाचा ईएमआय कमी होईल. एचडीएफसी ही नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणजेच एनबीएफसी आहे. अशा वेळी ते त्याच्या ग्राहकांना EBLR सुविधा देऊ शकत नाही. पण 1 जुलैनंतर ग्राहकांना ही सुविधा मिळण्यास सुरुवात होईल. सध्या HDFC होम लोन ग्राहकांना RPLR वर कर्ज मिळाले आहे. HDFC लिमिटेडच्या FD गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार? विलीनीकरणामुळे फिक्स्ड डिपॉझिट गुंतवणूकदारांवर परिणाम होणार नाही. FD मॅच्योर होईपर्यंत, जुन्या करारानुसार त्यांना HDFC बँकेकडून व्याज देणे सुरू राहील. FD मॅच्योर होईल तेव्हा ग्राहकांना पैसे काढण्याची सुविधा मिळेल. जर एखाद्या ग्राहकाला ते चालू ठेवायचे असेल, तर HDFC बँक फिक्स्ड डिपॉझिटवर जेवढं व्याज ऑफर करते, त्याचा लाभ मिळेल. HDFC च्या शेअर धारकांनो लक्ष द्या! या तारखेपासून बंद होईल ट्रेडिंग, पाहा शेअर होल्डरचं काय होणार देशभरात HDFC च्या किती ब्रांच? HDFC च्या देशभरात सुमारे 550 ब्रांच आहेत, तर HDFC बँकेच्या एकूण 9000 ब्रांच आहेत. विलीनीकरणानंतर, HDFC ग्राहक बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. HDFC बँकेचे होम लोन रेपो रेटसोबत जोडलेले आहे, जे सध्या 6.5% आहे. जेव्हा ते कमी होते, तेव्हा गृहकर्जाचा EMI कमी होतो. Credit Card ने चुकूनही करु नका ‘ही’ 3 कामं, होईल मोठं नुकसान! इटरेस्ट रेटमधील फरक किती? इंटरेस्ट रेटमधील अंतराविषयी बोलायचं झालं तर HDFC लिमिटेड 12-120 महिन्यांच्या FD वर 6.56 टक्के ते 7.21 टक्के व्याज देते. त्याच वेळी, HDFC बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 3% ते 7.25% पर्यंत व्याज देते. सामान्यतः NBFC FD गुंतवणूकदारांना अधिक व्याज देते. मात्र, डीआयसीजीसीचा लाभ एचडीएफसी बँकेत जमा केलेल्या भांडवलावर उपलब्ध आहे आणि 5 लाख रुपयांपर्यंत डिपॉझिट इंश्योर्ड राहतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात