Home /News /money /

Home Loan: लोन घेण्यापूर्वी तुमच्याकडे ही कागदपत्र आहेत का तपासा, पगारधारक असो किंवा सेल्‍फ एम्‍प्‍लॉइड हे दस्तावेज महत्त्वाचे

Home Loan: लोन घेण्यापूर्वी तुमच्याकडे ही कागदपत्र आहेत का तपासा, पगारधारक असो किंवा सेल्‍फ एम्‍प्‍लॉइड हे दस्तावेज महत्त्वाचे

Applying for Home Loan: घरखरेदीची योजना आखताना तुम्हाला काही कागदपत्रांची जुळवाजुळव करणं देखील आवश्यक आहे. तुम्ही पगारधारक असाल किंवा सेल्फ एम्प्लॉइड, काही कागदपत्रांची तुम्हाला कर्ज घेताना आवश्यकता भासेल.

    नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: घर घेण्यासाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य (Is it a good time to buy home) असल्याचे अनेक तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. देशातील महत्त्वाच्या बँका होम लोनवरील (Bank Offers on Home Loan) व्याजदरात, प्रोसेसिंग फीमध्ये सवलत देत आहेत. तर हाउस फायनान्सिंग कंपन्या, बिल्डर्स इ. कडून देखील नवं घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जबरदस्त ऑफर देऊ केल्या जात आहेत. होम लोनवरील व्याजदर तर रेकॉर्ड लो (Home loan interest rate at its lowest) स्तरावर आहेत. त्यामुळे हा काळ घरखरेदीसाठी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरखरेदीची योजना (Buy your own House) आखताना तुम्हाला काही कागदपत्रांची जुळवाजुळव करणं देखील आवश्यक आहे. तुम्ही पगारधारक असाल किंवा सेल्फ एम्प्लॉइड, काही कागदपत्रांची तुम्हाला कर्ज घेताना आवश्यकता भासेल. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी जर तुम्ही ही कागदपत्र तयार ठेवली तर तुमची कर्ज मिळण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल. पगारधारक आणि सेल्फ एम्प्लॉइड व्यक्तींसाठी कर्जासाठी अर्ज करताना काही कागदपत्र वेगवेगळी असतात. दरम्यान काही कागदपत्र दोन्ही अर्जदात्यांना सारखी द्यावी लागतात. SBI च्या वेबसाइटवर या कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या या दस्तावेजांची यादी... वाचा-Petrol Price: सलग तिसऱ्या दिवशी वधारले इंधनाचे दर, मुंबईत पेट्रोल 108 रुपयांपार सर्व अर्जदारांना द्यावी लागणारी कागदपत्र >> लोन अॅप्लिकेशन- लोन अॅप्लिकेशन फॉर्म भरून त्यासह तीन पासपोर्ट साइझ फोटो >> आयडेंटीटी प्रूफ- PAN/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदान ओळखपत्र (कोणतंही एक) >> निवास पुरावा: टेलिफोन बिल/वीज बिल/पाणी बिल/ गॅस पाइपलाइन बिल/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स /आधार कार्डची प्रत. (कोणतंही एक) प्रॉपर्टी पेपर्स >> कंस्‍ट्रक्‍शनसाठी मंजुरी (जर अॅप्लिकेबल असल्यास) >> विक्रीसाठी नोंदणीकृत करार (फक्त महाराष्ट्रासाठी) / विक्रीसाठी अलॉटमेंट लेटर किंवा शिक्का मारलेला करार >> ऑक्‍यूपेन्सी सर्टिफिकेट ( रेडी टू मूव्ह प्रॉपटीसाठी) >> शेअर सर्टिफिकेट (केवळ महाराष्ट्रासाठी), मेंटेनन्स बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट >> अप्रूव्ह्ड प्लॅन कॉपी (झेरॉक्स ब्लू प्रिंट) आणि बिल्डरचे रजिस्टर्ड डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट, Conveyance Deed (नवीन प्रॉपर्टीसाठी) >> बिल्डर किंवा विक्रेत्याला केलेली सर्व पेमेंट्स दर्शविणारी पेमेंट पावती किंवा बँक खाताच्या तपशील वाचा-सोन्याचांदीच्या किंमतीत जबरदस्त उसळी, सणासुदीच्या काळात खरेदीआधी तपासा आजचा भाव अकाउंट स्टेटमेंट >>अर्जदाराकडे असलेल्या सर्व बँक खात्यांचे गेल्या 6 महिन्यांतील बँक खाते विवरण >> जर तुम्ही इतर कोणत्याही बँकेकडून किंवा सावकारांकडून आधीच कर्ज घेतले असेल तर मागील एक वर्षाचे कर्ज विवरण पगारधारक अर्जदार, सह-अर्जदार, गॅरंटरचे इन्कम प्रूफ >> मागील तीन महिन्यांची सॅलरी स्लिप किंवा वेतन प्रमाणपत्र >> गेल्या दोन वर्षांची फॉर्म 16 ची प्रत किंवा गेल्या दोन आर्थिक वर्षांसाठी आयटी रिटर्न्सची प्रत पगारधारक नसलेले अर्जदार सह-अर्जदार, गॅरंटरचे इन्कम प्रूफ >> बिझनेस अॅड्रेस प्रूफ >> गेल्या 3 वर्षांतील आयटी परतावा >>  गेल्या 3 वर्षांची बॅलन्स शीट आणि नफा आणि तोटा खाते >> व्यवसाय परवाना तपशील >> टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म 16 ए, लागू असल्यास) >> सीए, डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी पात्रता प्रमाणपत्र
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Home Loan, Sbi home loan

    पुढील बातम्या