• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत जबरदस्त उसळी, सणासुदीच्या काळात खरेदीआधी तपासा आजचा भाव

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत जबरदस्त उसळी, सणासुदीच्या काळात खरेदीआधी तपासा आजचा भाव

भारतीय सराफा बाजारात आज महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) आज वाढले आहेत. आजच्या वाढीनंतर पुन्हा सोन्याचे दर प्रति तोळा 45 हजार रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: भारतीय सराफा बाजारात आज महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) आज वाढले आहेत. आजच्या वाढीनंतर पुन्हा सोन्याचे दर प्रति तोळा 45 हजार रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत. आज चांदीच्या किंमतीतही (Silver Price Today) उसळी पाहायला मिळाली आहे. आजच्या वाढीनंतर चांदीचे दरही 58 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त झाले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा  44,917 रुपये होते. तर चांदीचे दर 57,425 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. दरम्यान भारतीय बाजारांच्या उलट परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात (Gold Price Today in International Market) पाहायला मिळाली. याठिकाणी आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही आहे. सोन्याचे नवे दर शुक्रवारी सोन्याचा भाव 555 रुपये प्रति तोळाने वाढला आहे. या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर दिल्लीतील सराफा बाजारात 45,472 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 1,752 डॉलर प्रति औंसवर आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. हे वाचा-LIC IPO ठरणार कमाईची सुवर्णसंधी! वाचा देशातील सर्वात मोठ्या आयपीओविषयी सर्वकाही चांदीचे नवे दर चांदीच्या किंमतीत देखील आज मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचे दर 975 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. यामुळे चांदी आज 58,400  रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल न झाल्याने दर 22.16 डॉलर प्रति औंसवर आहेत. हे वाचा-Air India निर्गुंतवणूक प्रकरणात ट्विस्ट! TATA ने जिंकली नाही बोली;सरकारचा खुलासा का वाढले सोन्याचांदीचे दर? एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, फॉरेक्स मार्केटमध्ये आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 12 पैशांनी कमी झाल्याने 74.35 च्या स्तरावर व्यवहार होता. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळाला आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: