मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol Price Today: सलग तिसऱ्या दिवशी वधारले इंधनाचे दर, मुंबईत पेट्रोल 108 रुपयांपार; डिझेलचे दरही न परवडणारे

Petrol Price Today: सलग तिसऱ्या दिवशी वधारले इंधनाचे दर, मुंबईत पेट्रोल 108 रुपयांपार; डिझेलचे दरही न परवडणारे

Petrol-Diesel Price Today: IOCL ने आज पुन्हा एकदा सामान्य जनतेला झटका दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

Petrol-Diesel Price Today: IOCL ने आज पुन्हा एकदा सामान्य जनतेला झटका दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

Petrol-Diesel Price Today: IOCL ने आज पुन्हा एकदा सामान्य जनतेला झटका दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel price today) दरात वाढ केली आहे. इंधनाच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे सध्या देशभरातील विविध शहरात इंधनाचे दर ऑल टाइम हायवर (Fuel Price on All time High) आहेत. आज देशभरातील विविध शहरात पेट्रोलचे दर 110 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त आहेत. सरकारी तेल कंपन्यानी आज पेट्रोलच्या किंमतीत 25 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलचे दर 30 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत.

अनेक शहरांमध्ये पेट्रोल 110 रुपये लीटरच्या पुढे गेले आहे. आकडेवारीनुसार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वात महाग इंधनाची विक्री (Highest Petrol Rate) होत आहे. मध्यप्रदेशातील सिवनीमध्ये पेट्रोल 113.28 रुपये प्रति लीटर आणि राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये 113.01 रुपये प्रति लीटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे.

हे वाचा-ICICI Bank ची फेस्टिव्ह ऑफर! शॉपिंगपासून लोनपर्यंत मिळवा भरभक्कम सूट

तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याची गेल्या सात दिवसांतील ही सहावी वेळ आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यानंतर तेलाच्या किमतींवर परिणाम होत असतानाही इंधनाच्या किंमती खाली येण्यास बराच वेळ लागला. केंद्राने गुरुवारी नैसर्गिक वायूच्या किंमतीत 62 टक्के वाढ केली आहे.

चार महानगरातील इंधनाचे दर

>> दिल्ली पेट्रोल 102.14 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 108.19 रुपये आणि डिझेल  98.16 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 99.80 रुपये आणि डिझेल  95.02 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 102.77 रुपये आणि डिझेल 93.57 रुपये प्रति लीटर

हे वाचा-LIC IPO ठरणार कमाईची सुवर्णसंधी! वाचा देशातील सर्वात मोठ्या आयपीओविषयी सर्वकाही

अशाप्रकारे तपासा इंधनाचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.  तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petro price hike, Petrol, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise