Home /News /money /

गृह-वाहन कर्जावरील EMI भरणाऱ्यांना दिलासा, RBI च्या पॉलिसीत रेपो रेटमध्ये बदलाव नाही

गृह-वाहन कर्जावरील EMI भरणाऱ्यांना दिलासा, RBI च्या पॉलिसीत रेपो रेटमध्ये बदलाव नाही

आरबीआयने रेपो रेटमध्ये बदलाव न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा ईएमआय भरणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

    नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन पॉलिसीमुळे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट कर्जाचा ईएमआय भरणाऱ्या कर्जदारांना मोठा फायदा होणार नसला तरीही, आरबीआयने आधी केलेल्या कपातीत काहीसा दिलासा मिळत आहे. कारण अलिकडच्या काळात अनेक बँकांनी त्यांचे एमसीएलआर आणि रेपो लिंक्ड कर्ज दर कमी केले आहेत. आरबीआयने ऑक्टोबरमध्ये रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) अध्यक्ष असणाऱ्या या सहा सदस्यीय मॉनिटरी पॉलिसी कमिटीने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट 4 टक्क्यावर कायम राहणार आहेत. सर्व सदस्यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्ही  मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेन्डिंग रेट (MCLR) शी जोडलेले कर्जदार असल्यास, एमसीएलआरची घसरण झाल्यानंतर, जेव्हा रीसेट-पीरियड येईल तेव्हा तुमच्या कर्जावरील कमी ईएमआय कमी होईल. आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया अशा काही बँका आहेत ज्यांनी गेल्या काही आठवड्यात एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. आगामी काळात गृहकर्जावरील दरामध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे. (हे वाचा-व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, मार्च तिमाहीत GDP सकारात्मक होईल- RBI गव्हर्नर) रेपो रेट 4 टक्क्यावर कायम राहणार आहेत. यावेळी रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेपो रेट तो दर असतो ज्यावर बँकांना आरबीआय कर्ज देते. बँका या कर्जातून ग्राहकांना कर्ज देतात. रेपो रेट कमी होण्याचा अर्थ असा होतो की बँकांकडून मिळणारे विविध प्रकारची कर्ज स्वस्त होतात. यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज इत्यादींचा समावेश आहे. दरम्यान ऑक्टोबरमध्ये आरबीआयने रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तुमच्या कर्जावरील ईएमआयमध्ये देखील बदल होणार नाही. (हे वाचा-Gold Rate Today- आज सोन्याचांदीच्या किंमतीत वाढ, इथे वाचा गुरुवारचे नवे दर) दरम्यान आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास असे म्हणाले की, सध्या देशातील आर्थिक आकडेवारीतून चांगले संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीचे देखील संकेत मिळत आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Rbi, Shaktikanta das

    पुढील बातम्या