जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RBI Policy: व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, मार्च तिमाहीत GDP सकारात्मक होईल- RBI गव्हर्नर

RBI Policy: व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, मार्च तिमाहीत GDP सकारात्मक होईल- RBI गव्हर्नर

RBI Policy: व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, मार्च तिमाहीत GDP सकारात्मक होईल- RBI गव्हर्नर

RBI Monetary Policy: सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने (MPC-Monetary Policy Committee) व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑक्टोबर : एमपीसी (RBI Monetary Policy Committee (MPC) Meeting) ची बैठक 7 ऑक्टोबरपासून सुरू आहे, याबाबत आज अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला. काही महत्त्वाचे निर्णय यावेळी आरबीआयद्वारे घेण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) अध्यक्ष असणाऱ्या या सहा सदस्यीय मॉनिटरी पॉलिसी कमिटीने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट 4 टक्क्यावर कायम राहणार आहेत. सर्व सदस्यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात

आर्थिक वाढ पुन्हा एकदा रुळावर येत असल्याचे संकेत- आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास असे म्हणाले की, सध्या देशातील आर्थिक आकडेवारीतून चांगले संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीचे देखील संकेत मिळत आहेत. मॅन्यूफॅक्चरिंग, रिटेल विक्रीमध्ये देखील अनेक देशांत रिकव्हरी सुरू झाली आहे. एक्सपोर्टमध्ये देखील अनेक देशात सुधारणा झाली आहे. मार्च तिमाहीमध्ये जीडीपी सकारात्मक होण्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

त्यांनी असे म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येण्याची आशा निर्माण झाली आहे. आम्ही एका चांगल्या भविष्याचा विचार करतो आहोत. सर्वच क्षेत्रात परिस्थिती सुधारते आहे. वाढीची आशा वाटू लागली आहे. रबी पिकांचे आउटलुक देखील चांगले दिसत आहे. महामारीच्या या संकटाक सध्या कोव्हिड संक्रमण थांबवण्याशिवाय जास्त फोकस आर्थिक सुधारणांवर आहे. व्याजदरात बदल नाही रेपो रेट 4 टक्क्यावर कायम राहणार आहे. रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सहा सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय दिला. फेब्रुवारी 2019 पासून आतापर्यंच एमपीसी कडून 2.50 टक्के इतकी व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात