मुंबई, 17 जानेवारी: आयकर विषयी सर्वांनाच माहिती आहे. याचे नाव काढले तरी सर्वांनाच भीती वाटते. कारण कोणालाच आपल्या कमाईचे पैसे हे द्यावे वाटत नाही. ही विचारसरणी चुकीची असली तरीही जवळपास सर्वच लोक हे टॅक्स वाचवण्यासाठी विविध फंडे शोधत असतात. 2023 मध्ये तुम्ही देखील टॅक्स वाचवण्याची योजना आखत आहात का? असे असेल तर आम्ही तुम्हाला टॅक्स वाचवण्याचे काही सिक्रेट फंडे सांगणार आहोत. तुमच्यासाठी गुंतवणुकी चे विविध पर्याय उपलब्ध आहेत, जे तुमची संपत्ती वाढवू शकतात आणि तुमच्या कराचे ओझे कमी करण्यास मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया काही सोपे पर्याय…
पीपीएफ
PPF हा करमुक्त गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. कर वाचवण्यासाठी PPF (public provident Fund) नेहमी लोकांची पसंती असते. कारण PPF मध्ये 51 वर्षांसाठी गुंतवणूक लॉक केलेली असते त्यात गुंतवणूक केल्याने तुमची भविष्यातील बचत तसेच तुम्हाला अनेक फायदे मिळतात. तुम्ही PPF मधून 7 वर्षात 50% गुंतवणूक काढू शकता आणि PPF मध्ये केलेली गुंतवणूक करमुक्त आहे. त्यासोबत त्यावर मिळणारे व्याज देखील करमुक्त आहे. यासोबतच मॅच्युरिटी तारखेला मिळणारी रक्कम देखील करमुक्त आहे. कर वाचवण्यासाठी आणि भविष्यासाठी सेविंग करण्यासाठी हा सर्वोत्तम जोखीम नसलेला गुंतवणूक पर्याय आहे. तुम्हीही बँक लॉकरचा वापर करता का? जाणून घ्या नवे नियम
एफडी
कर वाचवम्यासाठी एफडी हा देखील उत्तम पर्याय आहे. मात्र सर्व प्रकारची एफडी करमुक्त नसते. 5 वर्षांच्या लॉक कालावधीची एफडी करमुक्त आहे. सामान्य बँका 10 वर्षांची एफडी सुविधा देतात आणि व्याजाची रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास डीटीएस कापला जातो. यापेक्षा कमी रक्कम करमुक्त आहे. पण हा सर्वोत्तम करमुक्त गुंतवणुकीचा पर्याय आहे Google ने नवी मुंबईत 28 वर्षांसाठी भाड्याने घेतली जागा, महिन्याचं रेंट वाचून व्हाल हैराण
एनपीएस
NPS हा देखील करमुक्त गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही कलम 80C अंतर्गत गुंतवणूक करून कर वाचवू शकता. 1.5 लाखांपर्यंत कर वाचवण्याबरोबरच, तुम्ही राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये वार्षिक 50,000 पर्यंत गुंतवणूक करू शकता आणि आयकरापासून मुक्त होऊ शकता. 2015 च्या अर्थसंकल्पात, सरकारने आयकर अधिनियम 1961 च्या कलमात सुधारणा केली आहे. 80CCD अंतर्गत वार्षिक रु. 50,000 पर्यंतची एनपीसी गुंतवणूक करमुक्त असेल, त्यामुळे अनेक जण या योजनेचा लाभ घेतात.
जीवन विमा
लाइफ इन्शुरन्स हा देखील करमुक्त बचतीसाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही त्यात गुंतवणूक केली तर ते तुम्हाला जीवन विम्यासह करमुक्त बचतीचा लाभ देते. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी जीवन विमा करुन घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सूट मिळू शकते. त्यात कलम 80 सी अंतर्गत सूट आहे. तुम्ही त्यात गुंतवणूक करून चांगले पैसे वाचवू शकता.
शैक्षणिक कर्ज
कर वाचवण्यासाठी तुम्ही शैक्षणिक कर्जाचा पर्याय देखील निवडू शकता. आयकराच्या कलम 80 ई नुसार तुम्ही स्वत:साठी यासोबतच पत्नी किंवा मुलांसाठी शैक्षणिक कर्ज घेतले. तर त्याच्या व्याजाची रक्कम करमुक्त असते.