मराठी बातम्या /बातम्या /मनी /Google ने नवी मुंबईत 28 वर्षांसाठी भाड्याने घेतली जागा, महिन्याचं रेंट वाचून व्हाल हैराण

Google ने नवी मुंबईत 28 वर्षांसाठी भाड्याने घेतली जागा, महिन्याचं रेंट वाचून व्हाल हैराण

google

google

पुढच्या दोन वर्षांत नवी मुंबईत डेटा सेंटर करण्याचा मानस आहे. त्यासाठी गुगलने जागा भाड्याने घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : गुगलने चक्क मुंबई सोडून नवी मुंबईत भाड्याने जागा घेण्यासाठी पसंती दाखवली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 28 वर्षांसाठी गुगलने ही जागा भाड्याने घेतली आहे. याबाबतचा करार झाल्याची माहिती मिळाली आहे. पुढच्या दोन वर्षांत नवी मुंबईत डेटा सेंटर करण्याचा मानस आहे. त्यासाठी गुगलने जागा भाड्याने घेतली आहे.

नवी मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीतील 3.81 लाख चौरस फूट डेटा सेंटरची जागा आहे. रेडेन इन्फोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या गुगल इंक कंपनीने आमथिन इन्फो पार्क्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ही जागा घेतली. याचं महिन्याचं भाडं 8.83 कोटी रुपये आहे. हा करार पुढच्या 28 वर्षांसाठी झाला आहे.

गुगलचा युजर्सना झटका; `ही` सुविधा लवकरच होणार बंद

याबाबतचे सर्व करार पूर्ण झाले असून लवकर गुगल डेटा सेंटरला इथे सुरुवात केल. हे भाडं पुढच्या 28 वर्षांसाठी सारखं राहणार नाही तर, यामध्ये वार्षिक 1.75 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याचं करारात म्हटलं आहे.

दोन्ही कंपन्यांनी मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. ऑक्टोबर 2022 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाल्याची चर्चा आहे. ही इमारत आठ मजली आहे. नवी मुंबईतील प्रस्तावित डेटा सेंटर दोन वर्षांत सुरू होणं अपेक्षित आहे.

UPI वरून बँक खात्यात चुटकीसरशी कसे ट्रान्सफर करायचे पैसे? वापरा ही सोपी ट्रिक

रेडेन इन्फोटेक इंडियाने 7 कोटी रुपये आता भरले आहेत. याशिवाय 26 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी गुगल इंक कंपनीला 10 वर्षांसाठी सुमारे 4.64 लाख चौरस फूट जागा भाड्याने घेतली होती. नोएडाच्या सेक्टर 62 मध्ये असलेल्या अदानी डेटा सेंटरमध्ये गुगलने जागा भाड्याने घेतली आहे.

First published:

Tags: Google