मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुम्हीही बँक लॉकरचा वापर करता का? जाणून घ्या नवे नियम

तुम्हीही बँक लॉकरचा वापर करता का? जाणून घ्या नवे नियम

ग्राहकांना आता बँक लॉकर सांभाळणे अगदी सोपे झाले आहे. मात्र बँकेची जबाबदारी वाढणार आहे. बँक लॉकरसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याच नियमांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

ग्राहकांना आता बँक लॉकर सांभाळणे अगदी सोपे झाले आहे. मात्र बँकेची जबाबदारी वाढणार आहे. बँक लॉकरसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याच नियमांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

ग्राहकांना आता बँक लॉकर सांभाळणे अगदी सोपे झाले आहे. मात्र बँकेची जबाबदारी वाढणार आहे. बँक लॉकरसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याच नियमांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

दिल्ली 16 जानेवारी बँक लॉकरचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकरसंबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. तुम्ही बँकेमध्ये लॉकरची सुविधा घेतली असेल तर बँकेने नवीन लॉकर अ‍ॅग्रीमेंटविषयी तुम्हाला सूचना दिली असेल. मात्र अद्यापही तुम्हाला कोणतीही सूचना आली नसेल तर लवकरच मिळू शकते.

अनेक लोक हे आपले मौल्यवान दागिणे, प्रॉपर्टीचे कागदपत्र, एफडीचे डॉक्यूमेंट्स हे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेतील लॉकरचा पर्याय निवडत असतात. बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या या सुविधेचा वापर अनेकांकडून केला जातो. यासाठी बँक वार्षिक चार्ज वसूल करत असते. दरम्यान आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकरसंदर्भात नुकतीच नवीन गाइडलाइन जारी केली आहे. त्यानंतर काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

ग्राहकांना लॉकर सांभाळणे होणार सोपे

नवीन नियमांनंतर ग्राहकांना लॉकर सांभाळणे सोपे होणार आहे. मात्र यानंतर बँकांची जबाबदारी वाढणार आहे. आता बँका लॉकर करारामध्ये कोणतीही अवास्तव अट किंवा नियम जोडू शकत नाहीत. तसेच कठीण अटी देखील ठेवू शकत नाही. एकूणच आता लॉकरची सेफ्टी मॅनेजमेंट आणि पडताळणी करावी लागणार आहे.

बँकांची चिंता वाढणार

लॉकरच्या सुरक्षेसाठी बँकांना पुरेशी व्यवस्था करावी लागेल. बँकेच्या निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्षामुळे आग, चोरी, दरोडाकिंवा इमारत कोसळल्यास बँका या 100 टक्के जबाबदार असतील. मात्र वीज कोसळणे, पूर येणे, भूकंप इत्यादी नैसर्गिक प्रकरणे बँकांच्या हातात नसतात. याला अ‍ॅक्ट ऑफ गॉड म्हटले जाते. त्यामध्ये बँकेची जबाबदारी नसेल. आरबीआयने गाइडलाइन्समध्ये स्पष्ट म्हटले आहे की, बँकांना सुरक्षेत वाढ करावी लागेल.

ग्राहकांना मिळेल सूचना

लॉकर वापरताना प्रत्येक वेळी ग्राहकाला एसएमएस आणि ईमेलद्वारे सूचना मिळेल. त्यामुळे त्यांच्या मनातील लॉकरची चिंता कमी होईल. जर तुमचा ईमेल आणि फोन नंबर बँकेत अपडेट केला नसेल तर तो लवकरच करुन घ्या. लॉकर इलेक्ट्रॉनिक सिस्टिमने चालवल्यास सुरक्षा उपायांसाठी बँक जबाबदार आहेत. जर ग्राहक पासवर्ड विसरला तर बँक नवीन पासवर्ड देईल. लॉकरची चावी हरवली तर लगेच बँकेला कळवा.

नॉमिनी आवश्यक

लॉकरची सुविधा घेत असताना अनेकदा लोक नॉमिनी बनवत नाहीत. मात्र असे चुकूनही करु नका. आपले लॉकर जॉइंट नावाने ओपन करा किंवा नॉमिनी अवश्य बनवा. अनेकदा लॉकर मालकासोबत काही दुर्घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना लॉकरपर्यंत पोहोचण्यास अडचणी येतात.

अ‍ॅग्रीमेंट करावे लागेल रिन्यू

तुम्ही आतापर्यंत अ‍ॅग्रीमेंट तयार केले नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन याविषयी माहिती घेऊ शकता. तसेच नवीन फॉर्म भरुन ड्यूटी स्टँप पेपरवर नवीन अ‍ॅग्रीमेंट तयार करु शकता.

First published:

Tags: Bank services, Rbi, Rbi latest news