मराठी बातम्या /बातम्या /मनी /मागील आठवड्यात 31 स्मॉलकॅप शेअरमध्ये 10-34 टक्के तेजी; पुढील आठवड्यात कशी असेल चाल?

मागील आठवड्यात 31 स्मॉलकॅप शेअरमध्ये 10-34 टक्के तेजी; पुढील आठवड्यात कशी असेल चाल?

कंपनीच्या शेअर्सने घातला धुमाकूळ

कंपनीच्या शेअर्सने घातला धुमाकूळ

गेल्या आठवड्यात बीएसई आयटीमध्ये 2.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर FMCG आणि हेल्थकेअर 1 टक्‍क्‍यांनी वाढले. दुसरीकडे, बीएसई Oil and Gas, पॉवर आणि बँकिंग 1 टक्क्यांहून अधिक घसरले. जर ब्रॉडर मार्कटवर नजर टाकली तर, बीएसई मिडकॅप निर्देशांकात 0.75 टक्के घसरण झाली.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 डिसेंबर : आठवडाभरात शेअर बाजारात (Share Market) चांगली रिकव्हरी पाहायली मिळाली. या आठवड्यात 31 स्मॉलकॅप शेअर होते, ज्यात 10-54 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर स्मॉलकॅप निर्देशांकात (Smallcap Index) या आठवड्यात 0.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यात कमकुवत सुरुवातीनंतर, बाजार वीकली आधारावर जवळजवळ सपाट बंद झाला. गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या केसेसमुळे बाजार अस्थिर राहिला. अखेरीस, BSE सेन्सेक्स वीकली बेसिसवर 112.57 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी घसरून 57,124.31 वर बंद झाला. तर, निफ्टी 18.55 अंकांनी किंवा 0.10 टक्क्यांनी घसरून 17,003.75 वर बंद झाला.

वेगवेगळ्या क्षेत्रांवर नजर टाकली तर, गेल्या आठवड्यात बीएसई आयटीमध्ये 2.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर FMCG आणि हेल्थकेअर 1 टक्‍क्‍यांनी वाढले. दुसरीकडे, बीएसई Oil and Gas, पॉवर आणि बँकिंग 1 टक्क्यांहून अधिक घसरले. जर ब्रॉडर मार्कटवर नजर टाकली तर, बीएसई मिडकॅप निर्देशांकात 0.75 टक्के घसरण झाली तर स्मॉलकॅप निर्देशांकात 0.3 टक्क्यांची घसरण झाली.

'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळ गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर

31 स्मॉलकॅप शेअर्समध्ये 10-54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात PTL Enterprises, Shareindia, Urja Global, Medicamen Biotech, Steel Exchange India, Everest Kanto Cylinder, Prozone Intu Properties और Mahanagar Telephone Nigam यांचा समावेश आहे.

पुढील आठवड्यात बाजाराची वाटचाल कशी असेल?

मेहता इक्विटीजचे प्रशांत तापसे म्हणतात की टेक्निकली 17,159 हा निर्देशांकासाठी मोठा अडथळा आहे. निफ्टी 17,159 ओलांडल्यानंतरच आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळेल. दुसरीकडे, जर निफ्टीने 16,663 ची पातळी मोडून काढली, तर निफ्टी 15,907 च्या दिशेने जाताना पाहू शकतो.

टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज एक चांगला पर्याय! वर्षाला होऊ शकते दीड लाखांची बचत

Samco Securitites च्या येशा शाह सांगतात की, पुढील आठवड्यात बाजार मंथली एक्स्पायरी आणि ओमिक्रॉनशी संबंधित बातम्यांवर लक्ष ठेवेल. त्यामुळे बाजारात चढ-उतार दिसून येईल. याशिवाय सेक्टरल रोटेशन देखील दिसू शकते कारण आता पडलेल्या क्षेत्रांना वेग आला आहे. ऑटो आणि रियल्टी शेअर्समध्ये आता उत्साह येण्याची शक्यता आहे, अशा स्थितीत या क्षेत्रांच्या घसरणीवर खरेदीचे धोरण अवलंबले पाहिजे. त्याचप्रमाणे आयटीलाही गती मिळताना दिसत आहे आणि ती सर्व वेळ पाहत आहे. एक्सेंचरच्या चांगल्या परिणामांमुळे आयटी क्षेत्रात तेजी दिसत आहे. दुसरीकडे बँका कमजोर राहिल्या आहेत.

Religare Broking चे अजित मिश्रा म्हणतात की बाजार कोविडच्या परिस्थितीकडे लक्ष देत आहे. या संबंधित कोणतीही सकारात्मक बातमी बाजाराला गती देऊ शकते. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत बाजार अस्थिर राहील. पुढील आठवड्यात बाजारात संमिश्र कल पाहायला मिळू शकतो. गुंतवणूकदारांनी आयटी, निवडक FMCG आणि फार्मा स्टॉक्सवरील दीर्घ व्यवहारांवर लक्ष ठेवावे. दुसरीकडे, बँकिंग पॅक सुस्त राहण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market