मुंबई, 25 डिसेंबर : तुम्ही देखील क्रेडिट कार्ड (Credit Card) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या कठीण काळात उपयोगी पडण्यासाठी क्रेडिट कार्ड हा उत्तम बॅकअप (Financial Backup) आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डशी संबंधित रिसर्च करत असाल, तर तुम्ही Secured आणि Unsecured क्रेडिट कार्डबद्दल ऐकले असेल.
Unsecured क्रेडिट कार्ड काय आहेत?
जर तुम्ही नवीन नोकरी सुरू केली असेल तर तुम्हाला Unsecured क्रेडिट कार्ड मिळणार नाही. बहुतेक क्रेडिट कार्ड्स केवळ Unsecured क्रेडिट कार्ड असतात. बहुतेक लोक हे क्रेडिट कार्ड वापरतात.
मागील आठवड्यात 31 स्मॉलकॅप शेअरमध्ये 10-34 टक्के तेजी; पुढील आठवड्यात कशी असेल चाल
Secured क्रेडिट कार्ड काय आहेत
Secured क्रेडिट कार्ड ही अशी कार्डे आहेत जी प्रथम सुरक्षितता म्हणून मुदत ठेव ठेवतात आणि नंतर ही कार्डे तुम्हाला दिली जातात. यावर बँकेचे नियंत्रण असते. कोणत्याही व्यक्तीने बँकेची फसवणूक करू नये म्हणून हे केले जाते. अशी शंका आल्यास बँक ही एफडी जप्त करते किंवा सुरक्षेसाठी जे काही दिले आहे ते जप्त केले जाते. ज्यांची क्रेडिट हिस्ट्री कमी किंवा नसते अशा लोकांना कार्ड देताना हे केले जाते. क्रेडिट कार्ड देणे हा जोखमीचा विषय आहे. अशा परिस्थितीतच बँका असे क्रेडिट कार्ड देतात.
'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळ गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर
कोणते क्रेडिट कार्ड चांगले आहे?
जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या जगात नवीन असाल आणि तुमच्याकडे क्रेडिट कार्ड हिस्ट्री नसेल, तर तुम्ही ते सुधारण्यासाठी Secured क्रेडिट कार्ड निवडू शकता. बर्याच बँका आता फक्त Secured क्रेडिट कार्ड देतात, कारण Unsecured क्रेडिट कार्डमध्ये बँकेला मोठी जोखीम पत्करावी लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Credit card, Investment, Money