Home /News /money /

तुम्ही शुद्ध सोनं खरेदी करत आहात का? जाणून घ्या काय आहे सरकारचा नियम

तुम्ही शुद्ध सोनं खरेदी करत आहात का? जाणून घ्या काय आहे सरकारचा नियम

तुम्ही सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला एका वर्षाचा तुरुंगवास किंवा 1 लाख दंड भरावा लागू शकतो.

    नवी दिल्ली, 08 जुलै: तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी (buy gold ornaments) एखाद्या ज्वेलरी शोरुममध्ये (Gold jewellery Showroom) जाता, तेव्हा तुम्ही काय किंमतीमध्ये दागिने खरेदी करायचे आहेत याचं बजेट निश्चित (Gold Price) करुन जाता. त्यानुसार सराफाकडून तुमच्या प्राइस रेंजमध्ये बसणारे दागिने दाखवण्यात येतात. तुमच्या शहरातील सोन्याच्या किंमतीनुसार दागिन्यांचे दर वेगवेगळे असतात. या किंमती ज्वेलर्सकडून निश्चित केल्या जातात. अशावेळी प्रत्येक ग्राहकाची अपेक्षा असते की त्याने दिलेल्या किंमतीनुसार त्याला योग्य शुद्धतेचं सोनं मिळणं गरजेचं आहे. मात्र तुम्ही हे कशाप्रकारे सुनिश्चित कराल की तुम्ही विकत घेतलेलं सोनं शुद्ध आहे आणि दागिने विक्री करणाऱ्याने सरकारद्वारे निर्धारित नियमांचं पालन करत त्याची विक्री केली आहे? दरम्यान याकरता आता सरकारने हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य केला आहे. त्यामुळे तुम्ही सोनेखरेदी करू इच्छित असाल तर त्याआधी जाणून घ्या सरकारने कोणते नियम जारी केले आहेत. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर बीआयएस हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. हे वाचा-खूशखबर! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, 8750 रुपयांनी स्वस्त आहे सोनं गोल्ड हॉलमार्किंग काय आहे? केंद्र सरकारने अशी माहिती दिली आहे की, गोल्ड हॉलमार्किंग देशातील सर्व सोने व्यापाऱ्यांना त्यांच्यकडील दागिने किंवा इतर कलाकृती विकताना लागू होईल. त्यांना बीआयएस स्टँडर्डचे मानक पूर्ण करणं आवश्यक असेल, तसं न केल्यास कठोर कारवाई देखील होऊ शकते. 14, 18 आणि 22 कॅरेटचे सोन्याचे दागिने विकण्यास परवानगी मिळेल. अतिरिक्त 20, 23 आणि 24 कॅरेट सोन्यासाठीही हॉलमार्किंग अनुमती लागेल. कशाप्रकारे सुनिश्चित कराल की 22 कॅरेटचे जे दागिने खरेदी करत आहात ते हॉलमार्क आहेत? सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासण्याासाठी त्यावर कॅरेट चिन्ह आहे का हे सर्वात आधी तपासा. सोनारांना आता प्रत्येक सोन्याच्या वस्तूवर हॉलमार्क आणि सोन्याच्या कॅरेटचं चिन्ह मुद्रीत करणं आवश्यक असणार आहे. तुम्हाला हे चिन्ह दिसत नसेल तर सराफाला 10x मॅग्निफाइंग लेन्स वापरुन ते तुम्हाला दाखवण्यास सांगा. हे वाचा-Gold Rate Today in Pune: काय आहे पुण्यातील सोन्याचांदीचा दर,इथे वाचा लेटेस्ट भाव होऊ शकते जेल सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही फसवणूक केल्यास 1 लाखापर्यंत किंवा त्या दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय बीआयएस कायदा, 2016 च्या सेक्शन 29 अंतर्गत 1 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो. तपासणीसाठी सरकारने BIS-Care असं App देखील लाँच केलं आहे. यामध्ये शुद्धता तपासण्याबरोबरच तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. याठिकाणी तुम्हाला हॉलमार्किंग संबंधातील तक्रारी नोंदवता येतील. घरातील सोन्याचं काय होणार? सर्वात आवश्यक बाब अशी आहे की तुमच्याकडे घरी असणाऱ्या सोन्याचं काय होणार? तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल तर लक्षात घ्या की हॉलमार्किंगचा हा नियम सोन्याचे दागिने विकणाऱ्या ज्वेलर्सवर लागू होणार आहे. ग्राहकांना त्यांचे दागिने हॉलमार्कशिवाय विकता येतील
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold price, Gold prices today, Jewellery shop, Money, Rbi

    पुढील बातम्या