जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Google मधील नोकर कपातीनंतर आता सुंदर पिचाईंवरही संकट, कंपनीनं घेतला 'हा' निर्णय

Google मधील नोकर कपातीनंतर आता सुंदर पिचाईंवरही संकट, कंपनीनं घेतला 'हा' निर्णय

sundar pichai

sundar pichai

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, वरिष्ठ उपाध्यक्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसमध्ये मोठी कपात केली जाणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 जानेवारी : जगातील सर्वात मोठी इंटरनेट सर्च इंजिन कंपनी गुगलशी संबंधित मोठी बातमी समोर येतेय. गुगलने आधीच जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. त्यांनी मोठी नोकर कपात केली. तसंच, आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक मोठी घोषणा केलीये. यानंतर गुगलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सुंदर पिचाई नेमकं काय म्हणाले याविषयी सविस्तर जाणून घेऊया…जगभरातील आर्थिक मंदीमुळे अनेक टेक कंपन्यांची अवस्था बिकट झालीये. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकून कंपनीचा खर्च कमी करण्याचा एकमेव मार्ग निवडलाय. गुगल सध्या 12,000 लोकांना कामावरून काढून टाकत आहे.

पगारात मोठ्या प्रमाणात कपात केली जाईल

दुसरीकडे, गुगल आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात करणारंय. गुगलच्या कर्मचार्‍यांसह नुकत्याच झालेल्या टाऊन हॉल बैठकीत, पिचाई यांनी वरिष्ठ उपाध्यक्षांच्या स्तरावरील सर्व कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी कपात केली जाईल अशी घोषणा केली.

Twitter यूझर्सला मिळाला मोठा अधिकार, 1 फेब्रुवारीपासून…

बैठकीत नेमके काय झाले?

टाऊन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत सुंदर पिचाई म्हणाले की, वरिष्ठ उपाध्यक्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसमध्ये मोठी कपात केली जाणार आहे. वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी, कंपनसेशन कंपनीच्या परफॉर्मेंसवर अवलंबून असेल. त्यांच्या संभाषणातून स्पष्ट जाणवले की, ते पगारात कपात करणार आहेत. मात्र, पिचाई यांनी पगारातील कपातीची टक्केवारी सांगितली नाही. तसेच किती काळ पगार कपात केली जाईल हे देखील स्पष्ट सांगितले नाही.

आता SBI मध्ये ऑनलाइन ओपन करा बँक अकाउंट, ही आहे सोपी प्रोसेस!

पिचाईंचा पगार किती आहे?

IIFL Hurun India Rich List 2022 नुसार, Google ने पिचाईचा 2 मिलियन डॉलर असल्याचे सांगितले होते. गुगलच्या सीईओची एकूण संपत्ती 20 टक्क्यांनी घसरून 5,300 कोटी रुपये झाली आहे. गुगलचे म्हणणे आहे की, यादीतील सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. सध्या गुगल वाईट काळाचा सामना करतेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात