मराठी बातम्या /बातम्या /मनी /Twitter यूझर्सला मिळाला मोठा अधिकार, 1 फेब्रुवारीपासून...

Twitter यूझर्सला मिळाला मोठा अधिकार, 1 फेब्रुवारीपासून...

ट्विटर

ट्विटर

टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यापासून यामध्ये सातत्याने काही तरी बदल होत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 जानेवारी: एलन मस्क ट्विटरचे नवे मालक बनले आणि कंपनीमध्ये मोठी उलथापालथ झाली. सातत्याने काहीना काही बदल यामध्ये होत आहेत. दरम्यान, कंपनीने शुक्रवारी सांगितले की, ट्विटर यूझर्स 1 फेब्रुवारीपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नवीन पुनर्स्थापना निकषांनुसार अकाउंट सस्पेंशन विरोधात आवाज उठवणे आणि मूल्यांकन करण्यास सक्षम असतील. नवीन नियमांनुसार, प्लॅटफॉर्म धोरणांचे गंभीर किंवा वारंवार उल्लंघन केल्यामुळेच ट्विटर खाती सस्पेंड केली जातील.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, गंभीर धोरण उल्लंघनांमध्ये बेकायदेशीर कंटेंट किंवा हिंसा किंवा हानी प्रवृत्त करणे किंवा धमकी देणे आणि इतर यूझर्सला टार्गेट करुन त्यांचा छळ करणे यांचा समावेश आहे. ट्विटरने म्हटले आहे की पुढे जाऊन, ते अकाउंट सस्पेंशनपेक्षा कमी कठोर कारवाई करतील. म्हणजेच त्यांच्या धोरणांचे उल्लंघन करणार्‍या ट्विट्सला मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचवणे किंवा अकाउंट सुरू ठेवण्यापूर्वी यूझर्सला ते वादग्रस्त ट्विट हटवण्यास सांगणे.

सोशल मीडियावर कसे कमावतात बक्कळ पैसे; Social media stars नीच सांगितलं सिक्रेट

डिसेंबरमध्ये मस्कच्या कंपनीने अब्जाधीशांशी संबंधित सार्वजनिक डेटा प्रकाशित करण्याच्या वादातून अनेक पत्रकारांचे अकाउंट सस्पेंड केले होते. मात्र, नंतर त्यांनी अकाउंट पुन्हा बहाल केले. एलन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटर विकत घेतले, तेव्हापासून काही ना काही बातम्या येत राहतात, ज्यामुळे जगभरात ट्विटरची चर्चा होते.

अ‍ॅमेझॉनवर आली ऑफिस विकण्याची वेळ; खर्चात कपात करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील

कंपनीने भारतातील 48,624 अकाउंट डिलीट केले आहेत

ट्विटरने 26 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान देशातील बाल लैंगिक शोषण आणि पोर्नोग्राफीला प्रोत्साहन देणाऱ्या 45,589 अकाउंटवर बंदी घातली आहे. त्याच वेळी, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने देशातील आपल्या प्लॅटफॉर्मवर दहशतवादाला प्रोत्साहन देणारी 3,035 खाती बंद केली आहेत.

48 हजारांहून अधिक अकाउंट्स केले बॅन

ट्विटरने रिपोर्टिंग पीरियडमध्ये भारतातील 48,624 खात्यांवर बंदी घातली. नवीन IT नियमांतर्गत, Twitter ने 2021 च्या मासिक अनुपालन रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, त्यांना भारतातील वापरकर्त्यांकडून एकाच कालावधीत 755 तक्रारी मिळाल्या आणि 121 URL वर कारवाई केली.

First published:

Tags: Elon musk, Twitter, Twitter account