Home /News /money /

Google मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार 75 हजारांचा भत्ता, 6 जुलैपासून टप्प्या-टप्प्याने उघडणार ऑफिस

Google मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार 75 हजारांचा भत्ता, 6 जुलैपासून टप्प्या-टप्प्याने उघडणार ऑफिस

Google ने देखील त्यांचे ऑफिस 6 जुलैपासून टप्प्या-टप्प्याने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1000 डॉलर भत्ता देणार असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले आहे.

    नवी दिल्ली, 27 मे : जगभरात जारी करण्यात आलेला लॉकडाऊन गेल्या काही दिवसांपासून शिथिल करण्यात येत आहे. दरम्यान Google ने देखील त्यांचे ऑफिस 6 जुलैपासून टप्प्या-टप्प्याने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जगभरात त्यांचे अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहे. या कर्मचाऱ्यांना गुगलने 1,000 डॉलरचा अर्थात भारतीय चलनाप्रमाणे साधारण 75 हजार रुपयांचा भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्क फ्रॉम होम दरम्यान कर्मचाऱ्यांनी ज्या आवश्यक उपकरणांसाठी खर्च केला आहे, त्याकरता ही रक्कम देण्यात येणार आहे. अल्फाबेट आणि Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जुलैपासून जगभरातील अनेक शहरांमध्ये गुगलचे अनेक नवीन ऑफिसेस उघडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. (हे वाचा-'नोकिया' कंपनीतही घुसला कोरोना, 42 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्लांट बंद) यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याची इच्छा आहे त्यांना रोटेशन बेसिसवर काम करण्याची संधी मिळेल, असं मत सुंदर पिचाई यांनी व्यक्त केलं. 'परिस्थितीनुसार गुगल सप्टेंबरपर्यंत रोटेशन प्रोग्रामचे प्रमाण वाढवून त्याची ऑफिस क्षमता 30 टक्के करेल. कारण आमची अशी अपेक्षा आहे की सर्वाधिक गुगलर्स यावर्षी वर्क फ्रॉम होमच सुरू ठेवतील. त्यामुळे ऑफिसच्या कामासाठी लागणारी उपकरणं आणि फर्निचरसाठी आम्ही त्यांना 1000 डॉलरचा किंवा त्या त्या देशाच्या चलनानुसार तेवढीच रक्कम देणार आहोत', अशी घोषणा पिचाई यांनी केली. त्यांच्या मते काही ठराविकच गुगलर्सची गरज गुगलच्या कार्यालयामध्ये भासणार आहे. (हे वाचा-कोट्यवधी ग्राहकांना SBI चा झटका! एफडी व्याजदरात मोठी कपात, वाचा काय आहेत नवे दर) त्यांनी अशी माहिती दिली की, गुगलच्या कोणत्याही ऑफिसमधील कर्मचाऱ्याला ऑफिसमधून काम करण्याची आवश्यकता असेल तर त्याबाबत तुमचा मॅनेजर 10 जूनपर्यंत माहिती देईल. बाकी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊन काम करणे ऐच्छिक असेल. गुगलकडून वर्क फ्रॉम होमला अधिक प्रोत्साहन देण्यात येत आहे. संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Google, Work from home

    पुढील बातम्या